निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापणार; मुख्यालय नागपुरात
By Admin | Published: December 2, 2015 02:14 AM2015-12-02T02:14:08+5:302015-12-02T02:14:08+5:30
वन क्षेत्रावर आधारित निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे मंडळ राज्यातील
मुंबई : वन क्षेत्रावर आधारित निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे मंडळ राज्यातील ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने आणि चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशा ५८ वन्यजीव संरिक्षत क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल.
या मंडळासाठी नियामक आणि कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात येणार असून त्याचे मुख्यालय नागपूर येथे राहणार आहे. नियामक मंडळाचे अध्यक्ष वनमंत्री, तर कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर हे राहतील.
हे मंडळ संपूर्ण राज्यातील वन, वन्यजीव आणि वन विकास महामंडळाच्या वन क्षेत्रात निसर्ग पर्यटन, नियोजन व नियमन करेल.
राज्यातील प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्रात दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक भेट देत असून भविष्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, सदर मंडळाची संकल्पना समोर आली.
निसर्ग पर्यटन निसर्ग संवर्धन, निसर्ग शिक्षण, स्थानिक लोकांच्या उपजिविकेची संधी वाढविण्याचे काम हे मंडळ करेल.
राज्यातील पर्यटनस्थळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचिवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची सदस्यता प्राप्त करण्यासह त्यांच्या कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी हे मंडळ प्रयत्न करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
- राज्यातील ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने आणि चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशा ५८ वन्यजीव संरिक्षत क्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे.