लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची अखेर स्थापना
By admin | Published: January 25, 2017 03:54 AM2017-01-25T03:54:01+5:302017-01-25T03:54:01+5:30
राज्यातील रेल्वेमार्ग प्रकल्प गतीने पूर्ण करता यावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भागिदारी असलेली महाराष्ट्र लोहमार्ग
मुंबई : राज्यातील रेल्वेमार्ग प्रकल्प गतीने पूर्ण करता यावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भागिदारी असलेली महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (एमआरआयडीसी) स्थापन करण्यास राज्य शासनाने आज प्रशासकीय मंजुरी दिली. या कंपनीसाठी राज्य शासनाचे भागभांडवल म्हणून ५० कोटी रुपये देण्यात येत असल्याचेही गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. अशी कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करार हा मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या मुख्य उपस्थितीत झाला होता. ही कंपनी नऊ रेल्वे मार्गांची उभारणी करेल. त्यावर २३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड-यवतमाळ, वडसा देसाईगंज-गडचिरोली, मनमाड-इंदूर, पुणे-नाशिक, कोल्हापूर-वैभववाडी, हे रेल्वेमार्ग तसेच नागपूर-नागभीड मार्ग ब्रॉडगेज करणे या प्रकल्पांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)