दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना

By Admin | Published: September 16, 2015 01:07 AM2015-09-16T01:07:09+5:302015-09-16T01:07:09+5:30

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली असून, संस्थेच्या माध्यमातून

Establishment of 'Name' Foundation for Drought Victims | दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना

दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना

googlenewsNext

पुणे : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली असून, संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यात येणार आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या विधवांना वैयक्तिक स्तरावर मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमाला आणखी व्यापक दिशा देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी नाना आणि मकरंद यांनी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी हा संकल्प प्रत्यक्षात उतरला. नाना पाटेकर म्हणाले, की संस्थेत जमा होणाऱ्या निधीमधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात येईल. २०१३, १४ आणि १५ या तीन वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल. त्याचबरोबर दुष्काळी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे, पारंपरिक ऊर्जास्रोत शोधून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. निधी जमा करण्यासाठी ‘नाम’ फाउंडेशनच्या नावाने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्यात आले आहे. इच्छुकांनी खाते क्रमांक ३५२२६१२७१४८ वर (आयएफसी एसबीआयएन ०००६३१९) धनादेश जमा करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन नानांनी केले.

चहावाल्याची मदत ! संस्थेची नोंदणी करण्यासाठी नाना पाटेकर धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर अनेकांनी तेथेच त्यांच्याकडे पैसे सोपविले. धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात चहा घेऊन येणाऱ्या चहावाल्यानेही तातडीने पाटेकर यांच्याकडे दोन हजार रुपयांची मदत सुपुर्द केली.

बारामतीच्या तरुणाईचा हात : बारामतीमधील तरुणांनी उस्मानाबादमधील आंबी गावात १५० कुटुंबांना प्रत्येकी १० किलो बाजरी आणि १० किलो तांदूळ असे
३ टन धान्याचे वाटप केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून बारामतीकरांना आवाहन करीत त्यांनी मदत मिळविली.

एक दिवसाचे वेतन : धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली.

Web Title: Establishment of 'Name' Foundation for Drought Victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.