सरकारला धडा शिकविण्यासाठी ‘राष्ट्रीय मराठा पार्टी’ची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:49 AM2017-07-20T00:49:53+5:302017-07-20T00:49:53+5:30
मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पक्षसंघटनानिमित्त ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवा, आदी मागण्यांसाठी राज्यात मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. शेतकरी संपावर जात आहेत, तरीही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. शेतकरी आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला मतदानाच्या पेटीतून योग्य उत्तर देण्यासाठी आम्ही ‘राष्ट्रीय मराठा पार्टी’ची स्थापना केली आहे.