सिम्बायोसिसतर्फे कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना
By Admin | Published: May 20, 2017 12:23 AM2017-05-20T00:23:20+5:302017-05-20T00:23:20+5:30
सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसजवळ किवळे येथे १५ एकराच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसजवळ किवळे येथे १५ एकराच्या विस्तृत जागेत विद्यापीठाचा कॅम्पस उभारण्यात आला असून राज्य शासनाने त्याला नुकतीच मान्यताही दिली आहे. कारखाने आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील अनुभवात्मक शिक्षण मिळावे तसेच उद्योग आणि बाजारपेठेत नोकरीसाठी प्रशिक्षित युवक उपलब्ध व्हावेत या हेतूने सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याची माहिती सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार व प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनी दिली. या वेळी सचिन कामत, एस. के. जैन, पुनिता गुप्ता उपस्थित होते. स्कूल आॅफ आॅटोमोबाईल अॅन्ड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, रिटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, अर्बन डेव्हलपमेंट, ब्युटी अॅन्ड वेलनेस, हेल्थ सायन्सेस अॅन्ड मॅनेजमेंट, पब्लिक पॉलिसी अॅन्ड अॅडमिनिस्ट्रेशन आदी कोर्सेसचा या विद्यापीठामध्ये समावेश असणार आहे. डिप्लोमा कोर्सेससाठी ३ ते १५ हजार, इंजिनिअरिंगसाठी १ लाख ८० हजार रुपये शुल्क असेल, अशी माहिती स्वाती मुजुमदार यांनी दिली.