एमपीएससीचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:16 AM2019-11-21T02:16:58+5:302019-11-21T02:17:10+5:30
पोलीस उपनिरीक्षक, कर निरीक्षक पदे भरणार
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा २०२०, पोलीस उप निरीक्षक, राज्य कर निरीक्षक आदी परीक्षांच्या संभाव्य तारखांचा या वेळापत्रकात उल्लेख आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी घेतल्या जाणाºया परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे आयोगाकडून अनेक पदे भरली जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सेवा परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून राज्य सेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल रोजी तर मुख्य परीक्षा ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत घेतली जाणार असल्याचे अंदाजित वेळापत्रकावरुन स्पष्ट होत आहे.
असहायक मोटार वाहन निरिक्षक परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२० मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्वपरीक्षा १५ मार्च रोजी तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी घेतली जाणार आहे. वन सेवा परीक्षेसाठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या पदासाठी १५ मे रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
पूर्व परीक्षा ५ एप्रिल रोजी
शासनाकडून संबंधित संवर्ग/पदासाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यात पदांची जाहिरात काढून वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे शक्य होणार आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.