इतेहाद, जेट एअरवेजसोबत पर्यटन विभागाचा करार

By admin | Published: April 26, 2017 02:00 AM2017-04-26T02:00:52+5:302017-04-26T02:00:52+5:30

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज

Etahad, Tourism Department's agreement with Jet Airways | इतेहाद, जेट एअरवेजसोबत पर्यटन विभागाचा करार

इतेहाद, जेट एअरवेजसोबत पर्यटन विभागाचा करार

Next

मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा सामंजस्य करार करण्यात आला. देशातील आणि परदेशातील पर्यटकांचा राज्यात ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या नेटवर्कचा फायदा मिळावा, यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला.
फडणवीस म्हणाले की, यंदाचे वर्ष हे व्हिजिट महाराष्ट्र २०१७ म्हणून साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन मान्यवर हवाई वाहतूक कंपन्या आणि पर्यटन विभागामध्ये होत असलेला सामंजस्य करार हा महत्त्वपूर्ण आहे. या करारामुळे देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, येथील वेगळेपण, पर्यटनस्थळे पाहता येणे शक्य होणार आहे.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, या दोन विमान वाहतूक कंपन्यांचे इनफ्लाईट मॅगझीन, वेबसाईट, कंपन्यांकडून होणारे प्रवासी मेळावे, प्रदर्शने आदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्कृती, पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचिवली जाईल. (प्रतिनिधी)
मुंबई शॉपिंग फेस्टीव्हल-
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध रेस्टॉरंट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, विविध खाजगी टॅक्सी कंपन्या, रेल्वे अशा सर्व खासगी-सार्वजनिक सेवांचे सहकार्य घेण्यात येत आहे. आयआरसीटीसी समवेत भागीदारीतून सावंतवाडी येथे रेल हॉटेल सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी दुबई फेस्टीव्हलच्या धर्तीवर २१ डिसेंबर २०१७ ते ६ जानेवारी २०१८ कालावधीत मुंबई मेला शॉपिंग फेस्टीव्हल होणार आहे.
कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, या विभागाचे नविनयुक्त प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, इतेहाद एअरवेजच्या प्रादेशिक महाव्यवस्थापक नीरजा भाटीया, जेट एअरवेजचे प्रमुख वाणिज्य अधिकारी जयराज षण्मुगम आदी उपस्थित होते.

Web Title: Etahad, Tourism Department's agreement with Jet Airways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.