ईटीएफ्सचा विस्तार देशातील ५८८ शहरांत

By admin | Published: April 4, 2017 04:45 AM2017-04-04T04:45:07+5:302017-04-04T04:45:07+5:30

भारतात एक्स्चेंज ट्रेडेड फंड्सचा (ईटीएफ्स) मोठा विस्तार होत आहे. ५८८ शहरांतील गुंतवणूकदार आता या प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत.

ETFs expand in 588 cities across the country | ईटीएफ्सचा विस्तार देशातील ५८८ शहरांत

ईटीएफ्सचा विस्तार देशातील ५८८ शहरांत

Next

मुंबई : भारतात एक्स्चेंज ट्रेडेड फंड्सचा (ईटीएफ्स) मोठा विस्तार होत आहे. ५८८ शहरांतील गुंतवणूकदार आता या प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत. २००७-२००८ मध्ये ४६४ शहरांतून ईटीएफ्समध्ये गुंतवणूक झाली होती आता ती ५८८ शहरांत विस्तारली आहे.
विशेष म्हणजे, उत्तर-पूर्वेकडील राज्यांतूनही मार्च २०१७ पर्यंत यात गुंतवणूक झाली आहे, असे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या ताज्या माहितीत म्हटले आहे. नव्याने सहभागी झालेल्या शहरांत ऐझवाल आणि मिझोराम आहे.
या दोन ठिकाणांहून २०१६-२०१७ वर्षात ईटीएफमध्ये
सर्वात जास्त (२६ कोटी रुपये) व्यापार झाला. ऐझवालच्या नंतर अरुणाचल प्रदेशातील पापुम
पारे शहराने २.६६ कोटी रुपयांचा व्यापार केला. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: ETFs expand in 588 cities across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.