मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व

By admin | Published: January 18, 2015 12:53 PM2015-01-18T12:53:40+5:302015-01-18T13:15:10+5:30

१२ व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडून काढत इथिओपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली.

Ethiopia dominates the Mumbai Marathon | मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - १२ व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडून काढत इथिओपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या तेजफाए अबेरा तर महिला गटात दिनकेश मेकाशने विजेतेपद कायम राखत इथिओपियाचा झेंडा फडकावला आहे. 
रविवारी सकाळी मुंबई मॅरेथॉनला दिमाखात सुरुवात झाली. सुमारे ४० हजार धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. मॅरेथॉननिमित्त मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रीटी मंडळी आवर्जून उपस्थित होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भूजबळ आदी नेतेही मॅरेथॉनमध्ये उपस्थित होते. रिलायन्सचे अनिल अंबानी, अभिनेता जॉन अब्राहीम, अभिनेत्री गूल पनाग, अभिनेता राहूल बॉस आदी कलाकारांनी मॅरेथॉनमध्ये उपस्थित होते.  
 
मॅरेथॉनचा निकाल खालीलप्रमाणे
पूर्ण मॅरेथॉन (पुरुष) - 
पहिला - तेजफाए अबेरा (इथिओपिया) - २.०९.४६
दुसरा - देरेजे देबेले (इथिओपिया) २.१०.३१
तिसरा - ल्यूक किबेट (केनिया) २.१० . ५७
 
 
पूर्ण मॅरेथॉन (महिला)- 
प्रथम - दिनकेश मेकाश (इथिओपिया), २.३०.००
द्वितीय - कुमेशी सिचाला (इथिओपिया) २.३०.५६
तृतीय - मार्टा मेगारा (इथिओपिया) २.३१.४५
 
पूर्ण मॅरेथॉन (भारतीय गट - पुरुष)
पहिला - करण सिंग
दुसरा - अर्जून प्रधान 
तिसरा - बहादूरसिंह धोनी
 
पूर्ण मॅरेथॉन (भारतीय गट - महिला)
प्रथम - जैशा ओ.पी.
द्वितीय - ललिता बाबर 
तृतीय - सुधा सिंग 
 
हाफ मॅरेथॉन  (पुरुष)
पहिला - इंद्रजीत पटेल
दुसरा - आटवा भगत
तिसरा - गोविंद सिंग
 
हाफ मॅरेथॉन (महिला)
प्रथम - कविता राऊत 
द्वितीय - इव्ह ब्गुलेर 
तृतीय - सुप्रिया पाटील

Web Title: Ethiopia dominates the Mumbai Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.