मूल्यमापन चाचणी एप्रिलमध्ये
By Admin | Published: March 2, 2016 03:39 AM2016-03-02T03:39:00+5:302016-03-02T03:39:00+5:30
प्रगत शैैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठीची दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी येत्या ५ व ६ एप्रिल रोजी होणार आहे.
पुणे : प्रगत शैैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठीची दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी येत्या ५ व ६ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील निवडक २००० शाळांमध्ये त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. दुसरी चाचणी पहिल्या चाचणीसारखी पुन्हा प्रश्नपत्रिकेद्वारेच घेतली जाणार आहे. त्यामुळे दुसरी चाचणी आॅनलाइन घेण्याचा शिक्षण विभागाचा मानस बारगळल्याचे दिसत आहे.
शाळांमध्ये राज्य स्तरावरून विद्या परिषदेच्या माध्यमातूनच परीक्षा घेतली जाणार असली, तरी परीक्षेसाठी त्रयस्थ संस्थांनी उपस्थित राहून मूल्यमापन करायला हवे. मात्र, पहिल्या पायाभूत चाचणीचे वेळापत्रक कोलमडल्यानंतर दुसऱ्या संकलित मूल्यमापन चाचणीला
उशीर झाला. मात्र, तोपर्यंत विद्या परिषदेकडे त्रयस्थ संस्थांचे अर्जच उपलब्ध न झाल्याने, त्या चाचणीच्या वेळेस या प्रकारे मूल्यमापन झाले नाही.
यंदाही प्रश्नपत्रिकेद्वारेच परीक्षा
पहिली पायाभूत चाचणी राज्य स्तरावर घेण्यात आली होती. मात्र, प्रश्नपत्रिका वेळेवर न पोहोचल्याने चाचणीचा कालावधी वाढवावा लागला होता.
हे लक्षात घेऊन आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर टाकून किंवा प्रश्नपत्रिकांची सीडी उपलब्ध करून, पुढील चाचणी घेण्याचे विद्या परिषदेने ठरवले होते. मात्र, ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्रश्नपत्रिकेद्वारेच चाचणी घेण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)