२६ जुलै २००५ पेक्षा काल खूप कमी प्रमाणात पाऊस पडला तरी सुद्धा महानगरपालिका संपूर्णतः फेल ठरली - संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 07:34 PM2017-08-30T19:34:33+5:302017-08-30T19:40:12+5:30

मुंबई, दि. 30-  मनपा आयुक्त आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २६ जुलै २००५ ची तुलना २९ ऑगस्ट २०१७ ...

Even before 26th July 2005, the rainfall was very low even though the corporation was completely failed - Sanjay Nirupam | २६ जुलै २००५ पेक्षा काल खूप कमी प्रमाणात पाऊस पडला तरी सुद्धा महानगरपालिका संपूर्णतः फेल ठरली - संजय निरुपम

२६ जुलै २००५ पेक्षा काल खूप कमी प्रमाणात पाऊस पडला तरी सुद्धा महानगरपालिका संपूर्णतः फेल ठरली - संजय निरुपम

Next

मुंबई, दि. 30-  मनपा आयुक्त आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २६ जुलै २००५ ची तुलना २९ ऑगस्ट २०१७ शी करत आहेत परंतु ते हे विसरलेले आहेत कि २६ जुलैला एका तासात ९४४ एमएम पाऊस पडला होता आणि काल बारा तासात ३२० एमएम पाऊस पडला होता. २६ जुलै पेक्षा काल त्यामानाने खूप कमी पाऊस पडलेला आहे आणि तरीही मुंबईची अवस्था यावेळी ही दयनीय झाली आहे. मुंबईचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले  आहे. मुंबई पाण्यामध्ये बुडाली होती. प्रत्येक वेळी निसर्गाला आणि पावसाळा दोष देऊन हे सरकार स्वतःच्या जबाबदारीतून हात झटकत आहेत.  मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या या परिस्थितीला शिवसेना आणि भाजप सरकारच जबाबदार आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.  

ते पुढे म्हणाले कि काल दिवसभराच्या पावसामुळे पूर्ण मुंबई ठप्प झालेली आहे. रेल्वे सेवा बंद पडलेली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. हिंदमाता परिसरात  ४ ते ५ फूट पाणी साचलेले आहे. केइएम हॉस्पिटलमध्ये पाणी भरलेले आहे. अंधेरी सबवे आणि वरळी सी लिंक मार्ग बंद करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजप सरकार व महापालिका आयुक्त अजोय मेहता जबाबदार आहेत. यांच्यामुळे मुंबई तुंबलेली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने ६ पंपिंग स्टेशन्स बसवलेले आहेत. ज्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. पंपिंग स्टेशन्सची क्षमता वाढवलेली नाही. ते नादुरुस्त झाले आहेत. महापालिकेतील शिवसेना-भाजप सरकारने ते पैसेसुद्धा खाल्ले. १२ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार असताना केंद्र सरकारकडून वादळी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी  BRIMSTOWAD प्रोजेक्ट अंतर्गत महापालिकेला १६०० कोटी रुपये देण्यात आले होते. याचे फक्त ४०% काम पूर्ण झालेले आहे.

महापालिकेद्वारे दरवर्षी सुमारे २ हजार कोटी रुपये ड्रेनेज सिस्टिमसाठी खर्च केले जातात. ४०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले जातात. तरीही मुंबई तुंबलेलीच आहे. ही महापालिकेकडून शिस्तबद्ध पद्धतीने केलेली लूट आहे. हिंदमाताजवळ पाणी साचणे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पश्चिम उपनगरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे खोदकाम करण्यात आले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. या सरकारने खूप मोठा रस्ते घोटाळा केलेला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरामधील लोकांचेही फार हाल झालेले आहेत. मुंबईकरांना पुन्हा एकदा २६ जुलै ची आठवण झालेली आहे. त्यातच भरीस भर म्हणून मुंबई महापालिकेचे आपत्कालीन  व्यवस्थापन विभागाचे प्रमुख दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग परिस्थिती आवाक्यात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले कि जर नालेरुंदीकरण आणि ड्रेनेज सिस्टीमवर सरकारने योग्य पद्धतीने भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम केले असते, तर मुंबईची अशी दयनीय अवस्था झाली नसती. या सरकारने फक्त भ्रष्टाचार केला. पैसे खाल्ले. त्यामुळेच आज सर्व मुंबईकर अडचणीत सापडलेले आहेत. मुंबईकर नियमित प्रामाणिकपणे टॅक्स भरतात. परंतु त्यांना सामान्य सुखसोईसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिका चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगरपालिकेची सत्ता सोडून द्यावी. 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी महापालिका आयुक्त म्हणाले होते की, पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा त्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरलेला आहे. मनपा आयुक्त सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत.त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहे की, महापालिका आयुक्त अजोय मेहता याना लाथ मारून या पदावरून हाकलले पाहिजे. मनपा आयुक्त बोगस ठरले आहेत. त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. 

{{{{dailymotion_video_id####x845afc}}}}

Web Title: Even before 26th July 2005, the rainfall was very low even though the corporation was completely failed - Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.