184 मि.मी पाऊस पडूनही बोथा प्रकल्प कोरडाच
By admin | Published: July 8, 2016 04:32 PM2016-07-08T16:32:34+5:302016-07-08T16:32:34+5:30
बुलडाणा तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात आतापर्यंत 184 मि.मी. पाऊस पडला आहे. मात्र, तरीही खामगाव मार्गावर असलेल्या बोथा जवळील तलाव कोरडा पडला असून पाण्याची पातळी वाढली नाही
Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा : बुलडाणा तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात आतापर्यंत 184 मि.मी. पाऊस पडला आहे. मात्र, तरीही खामगाव मार्गावर असलेल्या बोथा जवळील तलाव कोरडा पडला असून पाण्याची पातळी वाढली नाही. या तलावातून आजूबाजूला असलेल्या शेतीला पाणीपुरवठा होतो. ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या या प्रकल्पातील जलसाठ्याची ही स्थिती असून अन्य प्रकल्पांमध्येही अल्प जलसाठा आहे.
चांगला पाऊस पडूनही तलाव न भरल्याने शेतकरी व स्थानिक जनतेची अवस्था दयनीयच राहण्याची शक्यता आहे.