दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

By admin | Published: September 29, 2016 10:56 AM2016-09-29T10:56:05+5:302016-09-29T11:03:45+5:30

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाल हादरवणा-या कुख्यात खैरलांजी हत्याकांडाला आज, २६ सप्टेंबर २०१६ रोजी १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

Even after a decade of inhuman khalaranjai killings! | दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २९ - महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाल हादरवणा-या कुख्यात खैरलांजी हत्याकांडाला आज, २६ सप्टेंबर २०१६ रोजी १० वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र दशकभरानंतरही या हत्याकांडाची जखम अद्याप ओलीच आहे. 
 
महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून टाकणारे खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ ला घडले. २९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या गावातील भोतमांगे कुटुंबीयांची निर्घृण हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेला हा खून मानवतेला काळीमा फासणारा होता. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.
(‘खैरलांजी’ ची जखम अजूनही ओलीच)
 
पोलिसांनी या प्रकरणी १ ऑक्टोबर २००६ ला गुन्हा दाखल करून २७ डिसेंबरला भंडारा येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सी.बी.आय. ने या प्रकरणी ४७ जणांना आरोपी केले होते परंतु, त्यापैकी ३६ जणांची न्यायालयाने सुटका केली. शेवटी ११ आरोपींवर खटला चालला. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण ३६ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी या प्रकरणाची सुनावणी करून १५ सप्टेंबर २००८ रोजी निकाल सुनावत आठ आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर केली. मात्र त्या शिक्षेला आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असून भैय्यालाल भोतमांगे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Even after a decade of inhuman khalaranjai killings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.