अविश्वास ठरावानंतरही तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा सपाटा सुरुच
By admin | Published: October 29, 2016 09:47 AM2016-10-29T09:47:03+5:302016-10-29T09:47:03+5:30
नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलात सुरु असलेलं 9 मजली इमारतीचं बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश तुकाराम मुंढेनी दिले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 29 - अविश्वास ठरावानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा सपाटा सुरुच ठेवला आहे. अविश्वास ठरावानंतर तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करत शिक्षण सम्राटांना दणका दिला आहे. नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलात सुरु असलेलं 9 मजली इमारतीचं बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत याची परवानगी रद्द करून बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश तुकाराम मुंढेनी दिले आहेत.30 दिवसांत ही इमारत स्वत:हून जमीनदोस्त न केल्यास महापालिका जमिनदोस्त करणार आहे.
आणखी बातम्या -
लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. अपक्षांसह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या १०४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मुंढेंचे समर्थन केले.पाच महिन्यांपूर्वी आयुक्तपदी आल्यापासून मुंढे यांनी अतिक्रमण, अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली होती. त्यांना जनतेतून पाठिंबा होता, मात्र या कारवाईमुळे दुखावलेल्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला.