भाजपा आमदाराची फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ, पोलीस अधिका-यालाही दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 08:52 PM2017-09-10T20:52:21+5:302017-09-10T20:52:29+5:30

सत्तारुढ भाजपाचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी जुहूतील मिठीबाई कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांवर अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याला अत्यंत उद्धटपणे दमदाटी करीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे.

Even the BJP MP's hawkers, the senior villagers, the police officer, will be able to help | भाजपा आमदाराची फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ, पोलीस अधिका-यालाही दमदाटी

भाजपा आमदाराची फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ, पोलीस अधिका-यालाही दमदाटी

Next

मुंबई, दि. 10 - सत्तारुढ भाजपाचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी जुहूतील मिठीबाई कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांवर अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याला अत्यंत उद्धटपणे दमदाटी करीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे. त्यांच्या या कृत्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, हप्ता देत नसल्याने साटम यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार फेरीवाला संघटनांनी जुहू पोलिसांकडे केली आहे. तर साटम यांनी त्याचा इन्कार करीत अनाधिकृतपणे बसणा-या फेरीवाल्यांविरुद्ध पालिकेला कारवाई करण्यास भाग पाडल्याचे सांगितले. सात सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. त्याचे व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्याने आमदार साटम यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

पश्चिम उपनगरातील जुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर फेरीवाले अनधिकृतपणे अतिक्रमण करून परिसरातील वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप करीत साठम यांनी शुक्रवारी दुपारी या फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर तेथे उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिका-याला उद्देशून ‘ तुम्ही कमरेला पिस्तूल लावून फिरता शरम वाटली पाहिजे तुम्हाला, तुमचे काम मी करतो, तुमचा पगार माझ्या अकाऊंटवर जमा करा, अशी दमदाटी केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते. एका मोबाईलवरून चित्रण केलेल्या एक मिनिटाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, भाजपा व आमदार साटमवर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, फेरीवाल्यांनी याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून, काही दिवसापासून दोघे जण आपल्याकडे साटम यांची माणसे असल्याचे सांगून हप्ता सुरू करण्यास सांगत होते, त्याला नकार दिल्यानंतर ७ सप्टेंबरला साटम यांनी स्वत: येऊन आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. महापालिकेला व पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. साटम यांच्या सुुरक्षारक्षकाने बंदुकीने एका फेरीवाल्याला मारहाण केल्याने चेह-यावर जखम झाली असून या सर्वांविरुद्ध खंडणी, दमदाटी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई फेरीवाला युनियनतर्फे केली आहे.

तर आमदार साटम यांनी या आरोपाचा इन्कार केला असून, हे फेरीवाले अनधिकृतपणे बसत असून त्यांच्यामुळे नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आपण पालिकेच्या कर्मचा-यांना कारवाई करण्यास भाग पाडले, असे सांगितले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Even the BJP MP's hawkers, the senior villagers, the police officer, will be able to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.