शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 01:13 PM2022-07-29T13:13:19+5:302022-07-29T13:13:52+5:30

दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही असं आमदार बच्चू कडू यांनीसां

Even if 40 Shiv Sena MLAs return, there is no threat to the BJP government Says BJP Bacchu Kadu | शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

googlenewsNext

अमरावती - नाना पटोलेंना माहिती नसावी. अपंगांना कमकुवत समजत असाल तर ते तुम्हाला कळाले नाहीत. दिव्यांग कमकुवत नाहीत. तुमच्यापेक्षा सक्षम आणि मजबूत आहेत. दिव्यांगांना कमकुवत समजण्याचं डोक्यातून काढून टाका. पॅरा ऑल्मपिकमध्ये सगळ्यात जास्त पदके दिव्यांगांनी आणली. नाना पटोलेंनी हे शब्द मागे घेतले पाहिजे. दिव्यांगांना कमकुवत समजत असाल तर त्याचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही. शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान दिले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही. याबाबत जीआर आहे. अजितदादांना नियम आणि धोरणे माहिती आहे. त्यामुळे वेगळे काही मागणी करण्याची गरज नाही. ओला दुष्काळ कधी जाहीर करायचा याचे निकष आहेत. त्यानुसार तो जाहीर होईल. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. सध्या शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सरकार मदत द्यायला तयार मग आंदोलनाची गरज कशाला, सरकारने मदत केली नसती तर सरकारविरोधात उभं राहू असंही बच्चू कडू म्हणाले. 

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी...
भीतीपोटी विस्तार होत नाही हे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार भाजपाचं मग भिती कुणाची? शिवसेनेचे ४० आमदार पुन्हा गेले तरी राज्यातील सरकार भाजपा आणि अपक्ष आमदारांचे मिळून बनते. त्यामुळे भीती हा विषय नाही. काही किंतुपरंतु असते. महाविकास आघाडीत दीड महिना ६ मंत्र्यांचे सरकार चालवले. मागचे दिवस विरोधकांनी पाहायला हवेत असा टोला बच्चू कडू यांनी विरोधकांना लगावला आहे. सरकार नव्याने आले आहे. न्यायालयीन बाब आहे. त्यात राज्यात अतिवृष्टी आहे त्यामुळे पहिलं प्राधान्य शेतकऱ्यांना दिले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यापेक्षा विस्तार महत्त्वाचा आहे का? त्यामुळे विलंब होत असल्याचं बच्चू कडूंनी सांगितले. 
 

Web Title: Even if 40 Shiv Sena MLAs return, there is no threat to the BJP government Says BJP Bacchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.