एकनाथ शिंदे फिट नाहीत तरी..., असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही - गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:17 PM2023-07-29T14:17:43+5:302023-07-29T14:19:13+5:30
प्रत्येकाला जे जे अनुभव आले आहेत त्यानुसार हे प्रवेश होत आहेत. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येईल तसे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, असे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सभा घेणार आहेत. यावर गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचाही पक्ष आहे, सभा घेणे हे त्यांचे काम आहे आणि त्यांनी सभा घेतलीच पाहिजे. पहिला संवेदनशील मुख्यमंत्री आहे जो शरीर फिट नसताना उंच ठिकाणी असतानाही चार तास तो माणूस वरती उंचावर चढून गेला, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही, असे गुलाबराव म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दोन बसचा पहाटे अपघात होवून या अपघात 6 जण ठार झाले. सद्यस्थितीत मृतदेहांच्या विल्हेवाट सह जखमींची काळजी घेणे महत्त्वाचे असून या अपघाताप्रकरणी चौकशी करून दोन दिवसात अपघाताचे कारण काय, हे समजेल असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
प्रत्येकाला जे जे अनुभव आले आहेत त्यानुसार हे प्रवेश होत आहेत. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येईल तसे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, असे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर पाटील म्हणाले.
एरंडोल येथील अत्याचाराच्या घटनेबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. संशयित दोघेही छत्रपती संभाजी नगर येथील असल्याने त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या घटनेत काही पीडित मुलेसुद्धा असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यानुसार कलम लावण्यात आले आहेत. अशा वस्तीगृहांमध्ये रात्रीच्या वेळी काम करणारे कर्मचारी हे निष्काळजीपणे काम करतात का असाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित आहे. फार भयंकर ही घटना आहे. त्यामुळे हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी आम्ही करणार आहेत. अशा घटनांमधील नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील म्हणाले.