एखादा घटक पक्ष एनडीएतून बाहेर पडला, तरी फरक पडणार नाही : दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:17 AM2018-11-27T06:17:06+5:302018-11-27T06:17:26+5:30
परभणी : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपा तयारीत आहे़ शिवसेनेशी युतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच, पण एखादा घटक राष्ट्रीय लोकशाही ...
परभणी : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपा तयारीत आहे़ शिवसेनेशी युतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच, पण एखादा घटक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडला तर फारसा फरक पडणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला दिला.
दानवे यांनी सोमवारी परभणी जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली़ त्यानंतर ते म्हणाले, राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत आम्ही जात असून, प्रत्येक लोकसभेचा आढावा घेतला जात आहे़ आम्ही संपूर्ण तयारी केली आहे़ राज्यात शिवसेनेकडून भाजपावर टीका केली जात असली तरी २५ ते ३० वर्षांपासून भाजपा आणि शिवसेनेची युती आहे़ या वेळीही होईल. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांवर जनतेचा विश्वास असल्याने राज्यभरात भाजपाला अनुकूल परिस्थिती आहे़ या विश्वासावरच आम्ही निवडणुका जिंकूच़