गुलाबी थंडी गेली तरी कुठे? फेंगल इफेक्टमुळे 'नभ मेघांनी आक्रमिले'; काही शहरांत पावसाचा शिडकावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:00 AM2024-12-04T06:00:44+5:302024-12-04T06:00:59+5:30
एवढा सगळा बदल 'फेंगल' मुळे झाला.
मुंबई/नागपूर : गुलाबी थंडीची नवलाई नुकतीच कुठे सुरू झाली असताना 'नभ मेघांनी आक्रमिले' आणि अग्गोबाई... गुलाबी थंडीचं काय घेऊन बसलात साधी थंडीपण गायब झाली की हो! गारठलेल्या विदर्भाचा पारा उसळला, काकडा भरलेला खान्देश उसासे टाकू लागला, मुंबईकरांचा नेहमीप्रमाणे घामटा निघाला, एवढंच कशाला काही मुलखात पावसाचा शिडकावा पण झाला. एवढा सगळा बदल 'फेंगल' मुळे झाला.
"फेंगल बंगालच्या उपसागरात जे हे फंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी किनारपट्टीवर धडकले. मुंबई त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातही मुसळधाराही बरसल्या. त्याच ढगांची दाटी महाटी मुलखावर झाली असून त्याने गुलाबी थंडीला पळवून लावले. दरम्यान, नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी हलका पाऊस झाला. मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.
कुठे किती किमान तापमान
ठाणे २५, मुंबई २४, पालघर २०.७ अलिबाग २१.५ छ. संभाजीनगर २२.४ डहाणू २१.१ जळगाव १८.८ नाशिक १७.६ परभणी रत्नागिरी २५.४.
डिसेंबर महिन्यात देशाचा वायव्य भाग, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील काह भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आ देशात दक्षिणेकडील भाग वगळता कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल.
- कृष्णानंद होसाळीव प्रमुख, हवामान विभाग,
असा आहे अंदाज
बुधवारी : सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात काही भागांमध्ये विजांसह पाऊस तर रत्नागिरी, सातार २१.७ पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता.