निवडणुकीची धामधूम सुरु झाली, तरी अस्वस्थता कायम

By admin | Published: September 13, 2014 11:41 PM2014-09-13T23:41:51+5:302014-09-13T23:41:51+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन निवडणुकीची धामधूम सुरू असली, तरी महायुती व आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटला नाही.

Even though the election campaign started, the discomfort continued | निवडणुकीची धामधूम सुरु झाली, तरी अस्वस्थता कायम

निवडणुकीची धामधूम सुरु झाली, तरी अस्वस्थता कायम

Next
पुणो : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन निवडणुकीची धामधूम सुरू असली, तरी महायुती व आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटला नाही.  जागांविषयीही काहीही न समजल्याने नेमके काय करावे, या संभ्रमात इच्छुक आहेत़
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चारही पक्षांचे  शहरातील विद्यमान आमदार पुन्हा  रिंगणात आहेत. मात्र, त्यांना पक्षातून इच्छुकांची मोठी स्पर्धा आहे.  दुस:या उमेदवारांना रिंगणात उतरवून प्रयोग करायचा की जुन्यांवरच मदार ठेवायची, याबाबत पक्षांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. 
कसबा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार, याचीच मुख्यत: चर्चा आह़े रोहित टिळक, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, प्रदेश महिला अध्यक्षा कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी इच्छुक आहेत.  मनसेकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव चर्चेत असले, तरी रूपाली पाटील यांनीही मुलाखत दिली आहे.  भाजपामध्येही नव्या चेह:यांना संधी देण्याची मागणी होत असून, राज्य पातळीवरील गटा-तटांची गणिते त्यासाठी मांडली जात आहेत.  
पर्वतीमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात  धुसफूस आहे.  श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर इच्छुक आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून लढलेले सचिन तावरे हे यंदा भाजपाकडून इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेतील सभागृहनेते सुभाष जगताप,  शशिकला कुंभार इच्छुक आहेत़ मनसेकडून शिवाजी गदादे पाटील यांच्यासह जयराज लांडगे, संदीप मोहिते, नीलेश नवलाखा हे इच्छुक आहेत़ मात्र, कोणाचेच नाव अद्याप निश्चित नसल्याने नेमकी लढत कशी असेल, याविषयी सध्या तरी नुसत्याच चर्चा रंगत आहेत़ 
शिवाजीनगरमधून काँग्रेसकडून विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना पक्षातूनच विरोध होत असून, काहींनी बंडखोरीची भाषा सुरू केली आह़े माजी मंत्री अॅड़ चंद्रकांत छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक दत्ता बहिरट, जुबेर पिरजादे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आह़े निम्हण येणार असल्याच्या बातम्यामुळे भाजपामध्ये दुस:या उमेदवाराच्या नावाची चर्चा मागे पडली होती़  मुंडेसमर्थक मुरलीधर मोहोळ, विकास मठकरी, विजय काळे, विनित कुबेर, मेधा कुलकर्णी, मनोहर मुसळे यांना आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा आह़े मनसेकडून लोकसभा आणि विधानसभा लढविणारे रणजित शिरोळे, परिक्षित थोरात हे प्रामुख्याने इच्छुक आहेत़ 
कॅन्टोंमेंट मतदारसंघात विद्यमान आमदार रमेश बागवे हे प्रमुख इच्छुक असून, त्यांच्याबरोबरच भीमराव पाटोळे, बाळासाहेब बोराडे, मुकेश धिवार इच्छुक आहेत़ महायुतीत शिवसेनेच्या नावावर असलेली ही जागा रिपब्लिकन पक्षाने मागितली आह़े पण, अद्यापही जागावाटप न झाल्याने जागा नेमकी कोणाला सुटणार हे कोडे सुटलेले नाही़   रिपब्लिकन पक्षाकडून परशुराम वाडेकर हे प्रमुख इच्छुक आहेत़ 
कोथरूडमध्ये शिवसेनेकडून विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्याबरोबरच प्रशांत बधे, श्याम देशपांडे, पृथ्वीराज सुतार यांनी मातोश्रीवर जाऊन मुलाखती दिल्या आहेत़ मागील निवडणुकीत दुस:या क्रमांकावर असलेले किशोर शिंदे, तसेच गजानन मारणो, अॅड़ गणोश सातपुते, राम बोरकर, राजाभाऊ बराटे हे मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत़ येथे राष्ट्रवादीकडून प्रमोद निम्हण, संदीप बालवडकर, अमित आगरवाल, विजय डाखले, रवी दिघे हे इच्छुक आहेत़ 
हडपसरमधून शिवसेनेकडून विद्यमान आमदार महादेव बाबर हे एकमेव इच्छुक आहेत.  काँग्रेसकडून बाळासाहेब शिवरकर, बंडू गायकवाड, दिलीप तुपे हे इच्छुक आहेत़ मनसेकडून प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, साईनाथ बाबर, शिवाजी भाडळे, शिल्पा तुपे, विनोद धुमाळ, नितीन मगर हे इच्छुक आहेत़ 
खडकवासला मतदारसंघात विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासह  संदीप पोकळे, राजाभाऊ जोरी, प्रा. मनोहर बोधे, विश्वास अहिरे पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आह़े 
आघाडीमध्ये राष्ट्रवादी 
काँग्रेसच्या वाटय़ाला असलेल्या या जागेसाठी पक्षात तब्बल 26 जण इच्छुक आहेत़ त्यांच्यापैकी दत्तात्रय धनकवडे यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आह़े दिलीप बराटे, हर्षदा वांजळे, शुक्राचार्य वांजळे आदींनी मुलाखती दिल्या आहेत.  मनसेकडून राजाभाऊ लायगुडे, वसंत मोरे, बाळासाहेब मोकाशी, अरुण दांगट, बापू दांगट, कैलास दांगट, रितेश जाधव, अर्चना शहा आदींनी उमेदवारी मागितली आह़े 
वडगाव शेरी मतदारसंघात विद्यमान आमदार बापू पठारे यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष बापू कण्रे, प्रकाश म्हस्के, उषा कळमकर हे इच्छुक आहेत़ 
शिवसेनेकडून शहराध्यक्ष 
अजय भोसले, रघुनाथ कुचिक, नगरसेवक संजय भोसले, सचिन भगत हे इच्छुक आहेत़ ही जागा भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाकडून मागितली जात आहे.  मनसेकडून सुनील टिंगरे, मोहनराव शिंदे, स्वप्निल चव्हाण, नारायण गलांडे, हेमंत बत्ते इच्छुक आहेत़ 
पक्षनेत्यांनी आपल्याला काम सुरू करा, असे सांगितले असल्याचे व आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा विविध पक्षांतील इच्छुक करत आहेत़ मात्र, कोणालाही अजूनही खात्री नाही़ त्यामुळे केवळ कार्यकत्र्याना एकत्र करून रणनीती तयार करण्यावर सध्या सर्व इच्छुकांचा भर आह़े 

 

Web Title: Even though the election campaign started, the discomfort continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.