कधी शिवजयंती साजरी केली का?
By admin | Published: October 2, 2014 01:12 AM2014-10-02T01:12:35+5:302014-10-02T01:12:35+5:30
गरज सरो आणि वैद्य मरो, अशी भाजपाची भूमिका आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ते आशीर्वाद मागत आहेत.
Next
अभिमन्यू कांबळे - परभणी
गरज सरो आणि वैद्य मरो, अशी भाजपाची भूमिका आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ते आशीर्वाद मागत आहेत. छत्रपतींच नाव घेणा:या या भाजपावाल्यांनी कधी शिवजयंती तरी साजरी केली आहे का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी परभणी येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना केला.
महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी युती तोडली आहे, याबद्दलचा प्रचंड संताप जनतेच्या मनामध्ये आहे, असे सांगून उद्धव म्हणाले, छत्रपतींचे आशीर्वाद मागता, पण ते घेण्याची व पेलण्याची ताकद लागते. देशात नरेंद्र मोदी यांची लाट असेल तर महाराष्ट्रात कशाला सभा घेत आहात, असाही सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला त्यावेळी कधी केंद्रातील मंत्री राज्यात आले नाहीत. आणि आता प्रचारासाठी केंद्रातील भाजपाचे मंत्री येणार आहेत. परंतु त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. आता पैशाचा महापूर येईल, या महापुरात वाहून न जाता स्वत:चे नशिब विकू नका, असे आवाहनही त्यांनी केले.