एव्हरेस्टवीर रफिकचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत
By Admin | Published: June 8, 2016 10:28 AM2016-06-08T10:28:44+5:302016-06-08T14:45:46+5:30
माऊंट एव्हरेस्ट सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिकचे गुरुवारी औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ८ - जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिकचे बुधवारी रंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाने चिकलठाणा विमानतळापासून अधीक्षक कार्यालयापर्यंत भलीमोठ्ठी रॅली काढून शहराला या एव्हरेस्टवीराची ओळख करून दिली.
'जयोस्तुते'च्या गजरात अधीक्षक कार्यालयात पोलिस बँडने सलामी दिली. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या रफिक शेखने १९ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्याचे हे यश अनेकांना प्रेरणादेणारे आहे.
मराठवाड्यासाठी तो पहिला एव्हरेस्टवीर ठरला आहे. १९ मे च्या सकाळी ९.०२ मिनिटांनी रफिक जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता. एव्हरेस्ट शिखरापासून १०० मीटर अंतरावर असताना रफिकला भरुन आले होते. पुढची दहा मिनिटे तो रडत होता असे त्याने सांगितले.