एव्हरेस्टवीर रफिक शेखला हिमदंश
By admin | Published: May 23, 2016 05:18 AM2016-05-23T05:18:58+5:302016-05-23T05:18:58+5:30
माऊंट एव्हरेस्ट १९ मे रोजी सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक गिर्यारोहक शेख रफिकला या मोहिमेदरम्यान हिमदंश (फ्रॉस्ट बाईट) झाला आहे. त्याला शनिवारी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल केले आहे
औरंगाबाद : माऊंट एव्हरेस्ट १९ मे रोजी सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक गिर्यारोहक शेख रफिकला या मोहिमेदरम्यान हिमदंश (फ्रॉस्ट बाईट) झाला आहे. त्याला शनिवारी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल केले आहे. रफिकला गंभीर दुखापत झालेली नसल्याचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रफिकने एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला. मात्र उतरताना त्याच्या पायाला हिमदंश होऊन इजा झाली. त्यामुळे त्याला तातडीने कॅम्प २पासून हेलिकॉप्टरद्वारे बेस कॅम्पपर्यंत आणावे लागले होते. बेस कॅम्प ते लुकला आणि लुकला ते काठमांडू हा प्रवासही रफिकला हेलिकॉप्टरद्वारे करावा लागला. अधिक उपचारासाठी सोमवारी सकाळी त्याला दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) कॅम्प २ ते लुकला व लुकला ते काठमांडूचा हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करावा लागल्याने रफिकचा जवळपास नऊ लाख रुपये अतिरिक्त खर्च झाला. त्यामुळे त्याला पोलीस दलाकडून आर्थिक मदत करण्याबाबत विचार करू, असे रेड्डी यांनी सांगितले. रफिकविषयी सोमवारी सविस्तर माहिती देण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.