एरंडाची ‘होळी’ थांबणार कधी ?

By Admin | Published: March 4, 2015 02:30 AM2015-03-04T02:30:19+5:302015-03-04T02:30:19+5:30

शेताच्या धुऱ्यावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या एरंडीच्या झाडांवर होळीनिमित्त कुऱ्हाड चालविली जाणार आहे.

Evergreen 'Holi' to stop? | एरंडाची ‘होळी’ थांबणार कधी ?

एरंडाची ‘होळी’ थांबणार कधी ?

googlenewsNext

नीलेश शहाकार ल्ल बुलडाणा
शेताच्या धुऱ्यावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या एरंडीच्या झाडांवर होळीनिमित्त कुऱ्हाड चालविली जाणार आहे. होळीसाठी एंरडीचा वापर केला जात असल्यामुुळे राज्यातील ९हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली बहूमूल्य वनौषधी एरंड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एरंडाची अशी ‘होळी’ थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे.
आजही सार्वजनिक आणि घरगुती ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी पेटविली जाते. होळीत जाळण्यासाठी वृक्षतोड होते. होळीवर एरंडाच्या झाडाची फांदी बांधून होळी पेटविण्याची प्रथा आहे, यासाठी दरवर्षी एरंडाची शेकडो झाडे कापली जातात. शेताच्या धुऱ्यावर लावण्यात आलेल्या एरंडाच्या झाडाच्या फांद्या तोडून होळीत टाकण्यात येत असल्यामुळे नित्य उपयोगात एरंड ही वनऔषधी दुर्मीळ झाली आहे.
महाराष्ट्रात एरंडाचे क्षेत्र ९००० हेक्टर असून, त्यापासून मिळणारे उत्पादन २००० मेट्रीक टन आहे. बुलडाणा जिल्ह्यात एरंडाचे सरासरी क्षेत्र ५४० हेक्टर असून एरंड हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले जाते. कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती कीडनाशक म्हणून तसेच पारंपरिक औषधी तयार करण्यासाठी केला जातो.
येत्या गुरुवारी हजारो सार्वजनिक तसेच वैयक्तिक होळ्या जळणार आहेत. यामध्ये लाकडे, गोवऱ्या, पुरणपोळी, तुप यांची आहुती देत असतात. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात शुद्धता होण्यास मदतच होते, असा समज आहे. प्रत्येक होळीमध्ये एरंडाच्या झाडाची फांदी जाळण्याची परंपरा आहे. एकीकडे होळी दरम्यान ‘झाडे लावा झाडे जगवा’ आवाहन होत असताना दुसरीकडे शेकडो एरंडाची झाडे छाटली जाणार आहेत.

बहुगुणी एरंड
एरंड ही वनस्पती अशी आहे की बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनौषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मूत्रकुच्छ यांचा नाश होतो. पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने दूध वाढते. शिवाय पपई, द्राक्ष व इतर बागायती क्षेत्रात लावण्यात आलेले एरंडाचे झाड कीडनाशक म्हूणन काम करते.

च्मुंबई परिसरात एरंडाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शिवाय हे पीक धारवाड, बेळगांव व सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाचे आहे. राज्याबाहेर कोलकाता, तामिळनाडू, बैतूल, रायपूर व विलासपूर या ठिकाणी एरंडाची जास्त लागवड होते. एरंडेल तेलाचा औषधीत उपयोग होतो. म्हणून एरंडाची निर्यात करून महाराष्ट्र शासनाला दरवर्षी २ कोटी रुपये उत्पन्न मिळते.

Web Title: Evergreen 'Holi' to stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.