दिवसाला 2क्क् वाहनांची भर

By admin | Published: June 8, 2014 01:09 AM2014-06-08T01:09:45+5:302014-06-08T01:09:45+5:30

वाहतूककोंडीने मुंबईकर बेजार होत असतानाच मुंबईत दररोज सुमारे 2क्क् नवीन वाहन खरेदीची नोंद होत आह़े

Every day 2 vehicles will be filled | दिवसाला 2क्क् वाहनांची भर

दिवसाला 2क्क् वाहनांची भर

Next
>मुंबई : वाहतूककोंडीने मुंबईकर बेजार होत असतानाच मुंबईत दररोज सुमारे 2क्क् नवीन वाहन खरेदीची नोंद होत आह़े मुंबईत वाहनांसाठी आकरण्यात येणारा कर वाचवण्यासाठी ठाणो व नवी मुंबई येथे नोंदणी करून मुंबईत धावणा:या गाडय़ांची आकडेवारी हजारोंच्या वर आह़े 
मुंबईत अधिकृतरीत्या जवळपास तीनशेच्या वर नवीन गाडय़ा 
दाखल होतात़ याला योग्य पायबंद न घालता हे असेच सुरू राहिले तर येत्या काही दिवसांत हा प्रश्न गंभीर होणार आह़े वाहनांच्या या वाढत्या आकडेवारीचा याचा विचार केला असता मुंबईचे रस्ते वाहनांसाठी अपुरे पडण्याची चिन्हे असल्याचे दिसते आहे.  (प्रतिनिधी)
 
च्मुंबईला वाहतुकीची कोंडी व पार्किगची समस्या काही नवीन नाही़ त्यात पेट्रोल व डिङोलचे दर गगनाला भिडले आहेत़ असे असतानाही या मायानगरीत गाडय़ांचे प्रमाण कमी होत नाही़ 
च्या गंभीर समस्येची दखल घेत दोन महिन्यांपूर्वी एक कुटुंब एक गाडी, असा पर्याय न्यायालयाने शासनाला सुचविला होता़ 
च्या सूचनेबाबत विचार सुरू असल्याचे शासनाने न्यायालयाला कळवल्यानंतर शासनाने दिवसाला नोंदणी होणा:या गाडय़ांची आकडेवारी जाहीर केली़ त्यातून ही माहिती उघडकीस आली.
 
 वाढत्या प्रदूषणाने हैराण
च्गाडय़ा वाढल्याने वायू व ध्वनिप्रदूषणाचा विळखा मुंबईला बसला आह़े मुंबईकरही वाढत्या प्रदूषणाने हैराण झाले आहेत़ त्यात वाहतुकीच्या कोंडीने तर दररोज मुंबईकरांचे हाल होतात़ 
च्यावर तोडगा म्हणून शासनाने सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले, तर दुसरकडे पालिकेने पार्किगसाठी नवीन इमारतीमध्ये चार मजली पार्किगसारख्या युक्त्या लढवल्या़  
च्त्याचा काहीच परिणाम झाला नाही़ गाडय़ा वाढतच आहेत़ ही परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईकरांना रस्त्यावर चालण्यासाठी जागा राहणार नाही.
 
2क्13 
र्पयत मुंबईतील वाहनांची संख्या 6,72,223 इतकी होती़ ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आह़े विशेष म्हणजे ही अधिकृत आकडेवारी आह़े

Web Title: Every day 2 vehicles will be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.