दररोज ७० हजार भाविक घेतात दर्शन, २४ तास दर्शन : ५ दिवसात ३.५ लाख भाविकांना लाभ

By admin | Published: June 30, 2017 12:32 PM2017-06-30T12:32:45+5:302017-06-30T12:32:45+5:30

आॅनलाइन लोकमत सोलापूर

Every day, more than 70 thousand devotees take part in Darshan, 24 hours Darshan: 5 lakh beneficiaries in 5 days | दररोज ७० हजार भाविक घेतात दर्शन, २४ तास दर्शन : ५ दिवसात ३.५ लाख भाविकांना लाभ

दररोज ७० हजार भाविक घेतात दर्शन, २४ तास दर्शन : ५ दिवसात ३.५ लाख भाविकांना लाभ

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर : बाळासाहेब बोचरे
सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी ठेवून गेले काही दिवस विविध संत-सज्जनांच्या पालख्यांसोबत वाटचाल करणारे अनेक वारकरी २४ तास दर्शनाचा लाभ घेत असून, दररोज ७० हजार भाविक दर्शन घेत आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी वाटचाल करत आहेत. आषाढी वारीत दर्शन मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने काही वारकरी दिंडी सोडून मधूनच पंढरपूृरला जाऊन दर्शन घेऊन परत दिंडीत सामील होत आहेत. गेल्या २५ जूनपासून मंदिर समितीने २४ तास दर्शन सुरु केले आहे. त्यामुळे किमान १२ तासात वारकऱ्यांना दर्शन घडू लागले आहे.
बहुतांशी पालख्या पंढरपूरपासून ३० ते ४० किमीच्या परिसरात आल्या आहेत. फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथील वारकरी रामराव तुकाराम भुसे, त्र्यंबक दशरथ भुसे, रमेश त्र्यंबक साबळे, पंडित साबळे (गेवराई) कस्तुराबाई टकले, मीरा साबळे, शोभा साबळे, बाबूराव शिरसट (रा. राणी उंचेगाव, ता. अंबड, जि. जालना) हे वारकरी दर्शन करुन परत वारीत सामील झाले होते. मंदिर समितीने दर्शन रांगेत चांगल्या सुविधा दिल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------
वाळवंटात चोऱ्या सुरूच
वाळवंटात पुण्याहून एक दाम्पत्य चंद्रभागेत स्नानासाठी आले होते. पत्नी साडी नेसत होती तर पती नदीत गेले होते. दरम्यान, त्यांच्या सर्व सामानाची पिशवी चोरट्यांनी पळवून नेल्याने बिचारा फक्त अंडरविअरवर फिरत होता. असा कटू अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Every day, more than 70 thousand devotees take part in Darshan, 24 hours Darshan: 5 lakh beneficiaries in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.