प्रत्येक क्षणाला बाळासाहेबांची आठवण येते -राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2017 08:15 PM2017-01-27T20:15:34+5:302017-01-27T20:15:34+5:30
बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत राजकारण शिकलो आहे. प्रत्येक क्षणाला बाळासाहेबांची आठवण येतं
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.27 - बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत राजकारण शिकलो आहे. प्रत्येक क्षणाला बाळासाहेबांची आठवण येतं असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सांगितले. आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चेमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमात नारायण राणेंनी शिवसेना, शिवसेनाप्रमुख, कोकणाचा विकास आणि राजकीय प्रवास यावर भाष्य केलं.
युती तुटल्यावर शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, राजीनामा द्यायचाय तर लगेच द्या ना तो खिशात घेऊन फिरायला का लागलात शिवसेनेच्या मंत्र्यांनी बॅगा भरुन ठेवल्यात म्हणजे काय केलंय अशी कोपरखळीही त्यांनी मारलीये.
छगन भुजबळ यांच्या सध्य परिस्थितीवरही त्यांनी दु:ख व्यक्त केलं. राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. पूर्वी राजकारण राजकारणासाठी व्हायचं पण आता सूडाचे राजकारण सुरू आहे. भुजबळ मला ज्येष्ठ नेते होते, माझे सहकारीही होते. भुजबळ यांना आज जेलमध्ये जाण्याची वेळ ही त्यांच्यामुळे आली नाही तर त्यांना सुडापोटी जेलमध्ये टाकण्यात आलंय. अशा परिस्थिती राष्ट्रवादी त्यांच्या पाठिशी राहत नाही हे दुर्दैव आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.