मुंबईत दरवर्षी ३० हजार क्षयरुग्ण

By Admin | Published: March 20, 2016 02:42 AM2016-03-20T02:42:07+5:302016-03-20T02:42:07+5:30

लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या मुंबईसारख्या शहरात क्षयरोगाची लागण होण्याचा जास्त धोका आहे. दरवर्षी मुंबईत ३० हजार व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते, तर

Every year 30,000 Tuberculosis in Mumbai | मुंबईत दरवर्षी ३० हजार क्षयरुग्ण

मुंबईत दरवर्षी ३० हजार क्षयरुग्ण

googlenewsNext

मुंबई : लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या मुंबईसारख्या शहरात क्षयरोगाची लागण होण्याचा जास्त धोका आहे. दरवर्षी मुंबईत ३० हजार व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते, तर राज्यात १ लाख २० हजार नवीन व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. क्षयरोगाचा संसर्ग टाळण्यासाठी साधा उपाय म्हणजे शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
२४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळेस बोलताना, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी ५ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘मिशन फॉर टीबी कंट्रोल’विषयी माहिती दिली. त्याचबरोबर पालिका कोणत्या उपाययोजना करीत आहे, याचीही माहिती दिली. दरवर्षी देशात क्षयरोगाचे २२ लाख नवे रुग्ण आढळून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, पण ‘टीबी हारेगा, देश जितेगा’ ही मोहीम सक्षमपणे राबवण्यासाठी महापालिका आणि स्वयंसेवी संस्था कशा पद्धतीने कार्यरत आहेत, याची माहिती देत महापालिकेबरोबर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

जनजागृतीसाठी विविध उपाययोजना
मुंबईतील २० हजार रिक्षाचालकांच्या मदतीने रिक्षांवर स्ट्रीकर लावण्यात येणार आहेत. चालकांना क्षयरोगाची माहिती देण्यात येणार आहे. बेस्ट चालक आणि वाहक ‘टीबी हारेगा, देश जीतेगा’ असा संदेश लिहिलेला बिल्ला देण्यात येणार आहे.
विशिष्ट चित्रपटगृहात आणि रेडिओ स्टेशनवर जाहिरातीच्या माध्यमातून ‘टीबी हारेगा, देश जीतेगा’ हा संदेश देण्यात येणार आहे.
२४ वॉर्डमध्ये पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत. खासगी हॉटेल चेनमध्ये क्षयरोग संदेशाची भित्तीपत्रके लावण्यात येणार आहे.

रुग्णांना दिला जातो सकस आहार
प्रायोगिक तत्त्वावर तीन वॉर्डमध्ये एमडीआर आणि एक्सडीआर मिळून ३३४ रुग्णांना रेशन देण्यास सुरुवात केली आहे. सकस आहार मिळाल्याने, रोगप्रतिकारक शक्ती वाढून क्षयरोगावर मात करता येऊ शकते. जी - उत्तर, एम-पूर्व, सायन या वॉर्डमध्ये हा उपक्रम सुरू आहे.

एमडीआर टीबी वाढतोय
२०१५ मध्ये मल्टिड्रग्ज रेजिस्टंट आणि एक्टेंसिव्हली ड्रग्ज रेजिस्टंट संशयित रुग्ण म्हणून १६,७५० व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ३,६३२ व्यक्तींना एमडीआर तर ६४५ व्यक्तींना एक्सडीआर क्षयाची लागण झाल्याचे निदान झाले. २०१४ मध्ये एकूण १०,००२ लोकांपैकी ३,५२२ जणांना एमडीआर, तर ३९६ जणांना एक्सडीआर होता.

लहान मुलांनाही लागण : लहान मुलांनाही क्षयरोगाची लागण होते. एकूण क्षयरोग रुग्णांपैकी ७.५ ते ८ टक्के ही मुले असतात. २०१४ मध्ये ३३ हजार ८५१ लहान मुलांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ४४० मुलांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. यापैकी ४ ते ५ टक्के मुलांना एमडीआर, एक्सडीआर क्षयरोगाची लागण होते.

मुंबईत
झालेले मृत्यू
वर्षमृत्यू
२०१४१३३४
२०१५१५०६


शिवडी क्षयरोग रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टरांना क्षयरोगाची लागण आकडेवारी
२०१४१२
२०१५९

Web Title: Every year 30,000 Tuberculosis in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.