एसटीत लैंगिक छळाच्या दरवर्षी सरासरी ४0 घटना
By admin | Published: November 24, 2015 02:31 AM2015-11-24T02:31:44+5:302015-11-24T02:31:44+5:30
एसटीत दरवर्षी सरासरी ४0 घटना लैंगिक छळाच्या घटना घडत असून त्या विरोधात परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र एसटी
मुंबई : एसटीत दरवर्षी सरासरी ४0 घटना लैंगिक छळाच्या घटना घडत असून त्या विरोधात परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यव्यापी महिला कामगार मेळावा २५ नोव्हेंबर रोजी गिरगावातील भारतीय विद्याभवन येथे होणार आहे. या मेळाव्यात लैगिंक छळ आणि महिला कर्मचाऱ्यांविषयीच्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
राज्यातील एसटी महामंडळात विविध विभागात कार्यरत असणाऱ्या जवळपास एक हजार महिला कर्मचारी या मेळाव्यात सहभागी होतील, असे नाईकवाडे यांनी सांगितले. गरोदर महिला वाहकांना गरोदरपणात हलके काम किंवा टेबलवर्क देण्यात यावे, महिला कामगारांना स्वच्छ व पुरेशी विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे व पिण्याचे पाणी इत्यादी सोई मिळत नाहीत त्या पुरविण्यात याव्यात, लैंगिक छळ तक्रार निवारण समितीकडे आलेली प्रकरणे नि:पक्षपातीपणे हाताळण्यात यावीत व दबावतंत्राचा वापर होऊ नये, महिला वाहकांवर प्रवाशांकडून वाढत्या प्रमाणात होणारे हल्ले, शिवागिळ याविरोधात कारवाई व्हावी, महिला वाहकांना रात्रपाळीची कामगिरी देण्यात येऊ नये यासह अन्य मागण्या या मेळाव्यातून केल्या जाणार आहेत. यानंतर दोन ते तीन दिवसांत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची भेट घेण्यात येणार आहे.