पानमळयातून प्रतिवर्ष सव्वालाख रुपये उत्पन्न !

By Admin | Published: August 11, 2016 03:43 PM2016-08-11T15:43:15+5:302016-08-11T15:43:15+5:30

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील रमेश आप्पा लाहे या एका सर्वसाधारण शेतकºयाने दरवर्षी येत असलेल्या अस्मानी-सुल्तानी संकटाला

Every year Savarkar earns Rs. | पानमळयातून प्रतिवर्ष सव्वालाख रुपये उत्पन्न !

पानमळयातून प्रतिवर्ष सव्वालाख रुपये उत्पन्न !

googlenewsNext
- शंकर वाघ
शिरपूर जैन (वाशिम), दि. 11 -  मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील रमेश आप्पा लाहे या एका सर्वसाधारण शेतकºयाने दरवर्षी येत असलेल्या अस्मानी-सुल्तानी संकटाला कंटाळून स्वताच्या शेतातील दहा गुंठयामध्ये २५ हजार रुपये खर्चून पानमळा लावला. पानमळा लावल्यानंतर ८ महिन्यानंतर सुरु झालेल्या उत्पन्नातून त्यांना दरवर्षी सव्वा लाख रुपये उत्पन मिळत आहे. हे उत्पन्न सतत तीन वर्ष मिळणार असल्याने त्यांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कोैतूक होत असून ईतरही शेतकरी पानमळा लावण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतांना दिसून येत आहे. जिल्हयात पानमळा तयार करुन पान उत्पादक शेतकरी कमी असल्याने यांनी लावलेल्या पानमळयातील पानांना चांगला भाव मिळत आहे.  दरवर्षी सव्वा लाख रुपयातील उत्पनात वाढ होण्याची शक्यता सुध्दा लाहे यांनी वर्तविली आहे.

 

Web Title: Every year Savarkar earns Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.