मुंबईत दररोज २३ दुर्घटना

By admin | Published: May 18, 2017 03:27 AM2017-05-18T03:27:26+5:302017-05-18T03:27:26+5:30

गजबजलेल्या मुंबई शहरात छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, या अपघातांच्या संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाने सादर केलेल्या आकडेवारी नुसार

Everyday 23 casualties in Mumbai | मुंबईत दररोज २३ दुर्घटना

मुंबईत दररोज २३ दुर्घटना

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गजबजलेल्या मुंबई शहरात छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, या अपघातांच्या संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाने सादर केलेल्या आकडेवारी नुसार, जानेवारीच्या महिन्यात दिवसाला सरासरी २३ दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये आठ जणांचा मृत्यू व ३३ जण जखमी झाले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये आग लागणे, घराची पडझड, वाहन अपघात, समुद्रात पडून मृत्यू होणे, अशा दुर्घटनांचा समावेश आहे. मुंबईकरांच्या निष्काळजीनेही दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तसेच उत्तुंग इमारतींमध्ये आगीच्या दुर्घटना वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात मुंबईत एकूण ७०६ दुर्घटना घडल्या आहेत. अग्नी सुरक्षेचे नियम पाळण्यासाठी आणलेले कठोर नियम व कारवाईचा बडगाही हा धोका कमी करू शकलेला नाही. अग्निशमन दलाने १ ते ३१ जानेवारी २०१७ या महिन्यातील दुर्घटनांचा अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. या अहवालानुसार जानेवारी महिन्यात विविध प्रकारच्या ७०६ दुर्घटना घडल्या. त्यात ३३ जण जखमी झाले असून, आठ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत आग लागणे, नाल्यात पडणे, वाहन अपघात, समुद्रात बुडणे, घराच्या भिंतीची पडझड अशा ३१२ दुर्घटना घडल्या आहेत. त्यात १६ जण जखमी झाले, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या १६ लोकांमध्ये १५ पुरुष व एक महिला जखमी झाली आहे, तर तीन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. या तीनपैकी एकाचा समुद्रात बुडून, तर दुसऱ्याचा नाल्यात पडून आणि तिसऱ्याचा घरात पडून मृत्यू झाला आहे. १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत ३९४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये १७ जण जखमी, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृत्यूपैकी एकाचा घरात मृत्यू झाला आहे. दुसऱ्याने आत्महत्या केली आहे. तर उर्वरित तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

- अग्निशमन विभागाने दिलेल्या अहवालातील दुर्घटनांमध्ये आग लागणे, घराची पडझड, वाहन अपघात, समुद्रात पडून मृत्यू होणे, अशा दुर्घटनांचा समावेश आहे. त्यात मुंबईकरांच्या निष्काळजीनेही दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तसेच उत्तुंग इमारतींमध्ये आगीच्या दुर्घटना वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात मुंबईत एकूण ७०६ दुर्घटना घडल्या आहेत.

Web Title: Everyday 23 casualties in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.