"माझं कर्तृत्व सर्वांनी बघितलं आहे, त्यामुळं... ", शुभांगी पाटलांनी सत्यजित तांबेंना लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 09:09 AM2023-01-19T09:09:12+5:302023-01-19T09:10:15+5:30

Nashik Graduates Constituency Election : सत्यजित तांबे यांनी केलेल्या भावनिक ट्विट वरून देखील शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून केलेले ट्विट म्हणजे मतदारांशी डीलच सुरू असल्याचा आरोप लावला आहे.

"Everyone has seen my achievements, so...", Shubhangi Patil teased Satyajit Tambe on Nashik Graduates Constituency Election | "माझं कर्तृत्व सर्वांनी बघितलं आहे, त्यामुळं... ", शुभांगी पाटलांनी सत्यजित तांबेंना लगावला टोला 

"माझं कर्तृत्व सर्वांनी बघितलं आहे, त्यामुळं... ", शुभांगी पाटलांनी सत्यजित तांबेंना लगावला टोला 

Next

धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे धुळ्यातील उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी बुधवारी धुळे शहरातील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी शुभांगी पाटील यांनी विरोधी उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांनी केलेल्या "वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व मात्र सिद्ध करावा लागते" या ट्विटला प्रतिउत्तर देताना विरोधक उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांचा समाचार घेतला आहे. मी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर उतरले होते आणि माझं कर्तृत्व सर्वांनी बघितले आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला वारसाला मिळतं की कर्तृत्वाला मिळतं, हे 2 तारखेला जनता दाखवेलच, असे म्हणत शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना टोला लगावला आहे.

कपिल पाटील यांच्या सत्यजित तांबे यांना दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील हे शिक्षक आमदार आहेत, त्यांना हाडाची शिक्षिका दिसली नसावी असे म्हणत काम करणाऱ्यांना संधी न देता त्यांना आणखी दुसरा काही विचार त्यांनी केला असावा, असे म्हणत शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील यांच्या पाठिंब्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कपिल पाटील यांच्या पाठिंब्याचा फारसा परिणाम या निवडणुकीदरम्यान पडणार नसल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सत्यजित तांबे यांनी केलेल्या भावनिक ट्विट वरून देखील शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून केलेले ट्विट म्हणजे मतदारांशी डीलच सुरू असल्याचा आरोप लावला आहे. "तुम्ही जर मला माझ्या पडत्या काळात साथ दिली, तर माझा पुढील काळ हा संपूर्ण साथ देणाऱ्यांसाठी असेल" असे म्हणत मतदारांशी डील सध्या सत्यजित तांबे यांच्याकडून केली जात असल्याचा आरोप देखील शुभांगी पाटील यांनी केला आहे.

याचबरोबर, सध्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून सुरू असलेल्या पेचा संदर्भात मातोश्रीवरून उद्धव ठाकरे व संजय राऊत हे लवकरच महाविकास आघाडीच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मनवतील व मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल असा विश्वास यावेळी शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सुधीर तांबे यांनी काल धुळ्यात येऊन ज्या टीडीएस संघटनांचा पाठिंबा आपल्याला मिळाला आहे, असे स्पष्ट केले आहे. त्याच टीडीएस संघटना पुरोगामी विचाराच्या असून त्या भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे म्हणत टीडीएस संघटनेच्या सत्यजित तांबे यांच्या पाठिंबावर देखील शुभांगी पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

शिवसेनेच्या शिक्षक संघटनेसह विविध संघटना या आपल्या सोबत असल्याचे म्हणत त्यांच्यासोबत असलेल्या संघटनांचा उल्लेख देखील यावेळी शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलली, हे राजकारणाचे डावपेच असल्याचे काल धुळ्यात सांगितले. या त्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत राजकारणाचे डाव जनतेसोबत खेळल्यास जनता त्याचं उत्तर जरूर देते, असं शुभांगी पाटील यांनी सांगितले. 

Web Title: "Everyone has seen my achievements, so...", Shubhangi Patil teased Satyajit Tambe on Nashik Graduates Constituency Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.