सगळेच आपापला विचार करतायत, आपण महाराष्ट्राचा विचार करू; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 11:12 PM2023-05-05T23:12:22+5:302023-05-05T23:12:45+5:30
शनिवारी रत्नागिरीत राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे.
सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे कोकणात बारसू प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याचदरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी रत्नागिरीतराज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे.
शुक्रवारी राज ठाकरे यांची सभा पार पडणार असून या सभेचा टीझर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जारी करण्यात आलाय. रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडेल.
स्वाभिमानाची पालखी दिमाखात नाचवणाऱ्या कोकणी माणसाच्या समृद्धीसाठी राजगर्जना... ६ मे २०२३, चला रत्नागिरीला !#कोकण_राजगर्जनाpic.twitter.com/rMK0q37uSi
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 5, 2023
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हेदेखील शनिवारी बारसूमध्ये ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या लोकांना भेटण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे बारसू येथे येणार आहेत. यावेळी तेथे सभा घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र बारसू येथील आंदोलन तसेच सण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या आधीच जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे ठाकरे यांना बारसू येथे सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा पार पडेल.