अणुऊर्जेकडे सर्वांनी गांभीर्य पाहायला हवे

By Admin | Published: January 6, 2015 02:20 AM2015-01-06T02:20:23+5:302015-01-06T02:20:23+5:30

आण्विक ऊर्जाविषयक संशोधन विकास जगभर सुरू असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे ही आजची नितांत गरज बनली आहे,

Everyone needs to see the seriousness of nuclear energy | अणुऊर्जेकडे सर्वांनी गांभीर्य पाहायला हवे

अणुऊर्जेकडे सर्वांनी गांभीर्य पाहायला हवे

googlenewsNext

मुंबई : आण्विक ऊर्जाविषयक संशोधन विकास जगभर सुरू असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे ही आजची नितांत गरज बनली आहे, असे मत इंडियन सायन्स काँग्रेसच्या सोमवारी तिसऱ्या दिवशी झालेल्या अणुऊर्जाविषयक परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ऊर्जा पुरवठा सातत्याने करता यावा यासाठी अणुऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा फायदा घेणे निश्चितच हितकारक ठरेल, असे प्रतिपादन फ्रेंच आल्टरनेटिव्ह एनर्जी अ‍ॅण्ड आॅटोमिक एनर्जी संस्थेचे बर्नार्ड बिगॉट यांनी केले. अणुऊजेर्बाबत लोकांना अनेक समस्या, अडचणी वाटत असल्या तरी आपण अणुऊर्जेच्या फायद्यांबाबत लोकांना समजावून सांगितले पाहिजे. किंबहुना त्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच अणुऊर्जाविषयक संशोधन व विकास याबाबतची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. याबाबतचे ज्ञान जगभरात पोहोचविणे हेही तितकेच गरजेचे आहे, असेही बिगॉट यांनी यावेळी परिसंवादात नमूद केले.
अणुऊर्जाविषयी समग्र आणि वैश्विक दृष्टिकोन - वर्तमान आणि भविष्य या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद अणुऊर्जातज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भूषविले. अन्य वक्त्यांमध्ये आयआयटी मुंबईचे एस. पी. सुखात्मे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे शेखर बासू, गांधीनगरस्थित इन्स्टिटयूट आॅफ प्लाज्मा रिसर्चचे धीरज बोरा, अणुऊर्जा विभागाचे आर. के. सिन्हा आणि कौन्सिल आॅन एनर्जी, एनव्हायरन्मेंट अ‍ॅण्ड वॉटर या संस्थेचे अरूनभ घोष यांचा समावेश होता.
अणुऊर्जा आणि त्याची गरज यावर सुखात्मे म्हणाले की, आपण चुकीच्या लोकांना सवलतीमध्ये वीज देतो.अधिक श्रीमंत लोकांसाठी विजेचे अधिक दर यानुसार विविध आर्थिक स्तरांतील लोकांसाठी निरनिराळे विजेचे दर आकारले गेले पाहिजेत. बासू यांनी अणुऊजेर्चा आरोग्यसुविधा, कर्करोग उपचार, औषधोपचार यामधील वापर कसा करता येईल यावर विवेचन
केले. (प्रतिनिधी)

विविध देशांना ऊर्जा पुरवठ्याची गरज भासत असून त्याची पूर्तता करणे हे सहजसोपे नाही. ऊर्जेसाठी आपण खनिजरूपी इंधनावर तब्बल ८0 टक्के अवलंबून असलो तरी अनेक कारणांनी ही खनिजरूपी ऊर्जा कायमस्वरूपी आपल्याला मिळू शकणार नाही.

Web Title: Everyone needs to see the seriousness of nuclear energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.