नतमस्तक होणे प्रत्येकाचे कर्तव्य
By admin | Published: August 10, 2015 01:10 AM2015-08-10T01:10:51+5:302015-08-10T01:10:51+5:30
१९४२मध्ये ब्रिटिशांविरुद्ध देशभक्तांनी उठाव केला. वेगवेगळ्या मार्गांने लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण खर्ची घातले. स्वत:च्या कुटुंबाचाही विचार केला नाही
नागपूर : १९४२मध्ये ब्रिटिशांविरुद्ध देशभक्तांनी उठाव केला. वेगवेगळ्या मार्गांने लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण खर्ची घातले. स्वत:च्या कुटुंबाचाही विचार केला नाही. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या शहीद स्मारकावर नतमस्तक होऊन प्रेरणा घेणे हे
आपले कर्तव्य आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
झीरो माईलजवळ जुने मॉरिस कॉलेजच्या परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ
वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, खा. विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. नारायण चांदपूरकर, पुंडलिकराव जवंजाळ, विठ्ठलराव गोडे यांचा मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी गडकरी म्हणाले, लोकार्पण करण्यात आलेले शहीद स्मारक हे नागपूर शहराचा चालताबोलता इतिहास आहे. भूतकाळातील इतिहास वर्तमानातील दिशा ठरविण्यासाठी उपयोगी पडत असतो. या स्मारकापासून भविष्यातील पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.