सोलापूर साताऱ्यात ‘सब कुछ राष्ट्रवादी’
By admin | Published: March 15, 2017 12:23 AM2017-03-15T00:23:43+5:302017-03-15T00:23:43+5:30
जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली.
सातारा : जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली. खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेस तर कऱ्हाडच्या उपसभापतिपदी कऱ्हाड विकास आघाडीचा सदस्य विराजमान झाला. उर्वरित सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचाच गजर झाला आहे. सातारा पंचायत समितीच्या सभापतीपदी मिलिंद कदम व उपसभापतीपदी जितेंद्र सावंत यांची निवड झाली. हे दोघेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आहेत. खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे मकरंद ऊर्फ मारुती मोटे सभापती तर काँग्रेसच्या वंदना अविनाश धायगुडे या उपसभापती झाल्या. फलटण पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या रेश्मा भोसले सभापती झाल्या आहेत.
सोलापूर : राष्ट्रवादीकडे तीन पंचायत समित्या आल्या असून भाजपने देखील तीन सभापती पदे घेतली आहेत़ काँग्रेसला आणि सेनेला अवघ्या एका पंचायत समितीवर समाधान मानावे लागले आहे़ तीन ठिकाणी आघाड्यांचे सभापती निवडणूक आले आहेत़ पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या ठिकाणी भाजपने आपला झेंडा लावला आहे़ माळशिरस, माढा आणि बार्शी या ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती झाले आहेत़ सागोला,मंगळवेढा आणि मोहोळ या ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे सभापती झाले तर काँग्रेस आणि सेनेला अवघ्या एका-एका सभापतीपदावर समाधान मानावे लागले़