राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही; ईव्हीएम बिघाडाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:44 AM2019-04-18T09:44:54+5:302019-04-18T11:08:23+5:30
महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत.
मुंबई : राज्यात 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणाहून मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी तास दीड तासापासून मतदाराला रांगेत खोळंबून राहावे लागल्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे.
महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत. परभणीतील पालम तालुक्यात आरखेड येथे मशीन बिघाडामुळे एक तासा पासून मतदान बंद होते. पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेवरील मतदान यंत्र बंद पडले. शहरातील मतदान केंद्र क्रमांक 215 व 235 वरील मतदान यंत्र बंद पडल्याने नवीन यंत्र बसविण्यात आले. या ठिकाणी जवळपास अर्धा तास मतदार खोळंबळे होते. मानवत तालुक्यातील सावरगाव येथील मतदान केंद्रावरील एक मशीन अर्धा तासापासून बंद होते.
#LokSabhaElections2019 :Polling percentage recorded in Assam (5 seats)-9.51%,J&K (2 seats)-0.99%,Karnataka (14 seats)1.14%, Maha(10)-0.85%,Manipur(1)-1.78%,Odisha(5)-2.15%, TN(38)-0.81%, Tripura(1)-0.00%, UP(8)-3.99%, WB(3)-0.55%, Chhattisgarh(3)-7.75% & Puducherry-1.62%,till 9am pic.twitter.com/3pRbUFjdl4
— ANI (@ANI) April 18, 2019
तर अकोल्यातील व्याळा बुथ क्र. 123 वर मशीन बंद पडल्याने 1 तास उशिराने मतदान सुरू झाले. शिरलायेथेही मतदान यंत्र बंद पडले होते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील मतदान यंत्र सकाळपासून बंद मतदार रांगेतच होते. सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदान यंत्रात बिघाडचा घोळ कायम होता. बऱ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रभाग क्रमांक सात मधील सोलापूर महानगरपालिका उर्दू मुलींची शाळा क्रमांक 2 येथील दोन मशीन बंद होती. तर नीलम नगर जिल्हा परिषद शाळा ( प्रभाग 19) येथे देखील एक मशीन बंद पडली होती. अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे असलेल्या बूथ क्रमांक 274 मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला होता.
ईव्हीएमच चुकीच्या गावात गेले
अक्कलकोटयेथील बोरगाव येथे बूथ क्रमांक २ वरील मशीन दुसऱ्या गावी गेल्याने मतदानास उशीर झाला. मतदानाची वेळ सुरु होईनही ४५ मिनिट झाली तरीही मशीन आली नव्हती. मतदार ताटकळत थांबले होते. ईव्हीएम बंद पडण्याचा घोळ महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांमध्ये सुरु होता.
भिंगारा येथील मतदान केंद्रावर शून्य टक्के मतदान
जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासात शून्य टक्के मतदान, पायाभूत सुविधांसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.