माजी मंत्री पिचडांना दिलासा

By Admin | Published: September 29, 2016 12:26 AM2016-09-29T00:26:20+5:302016-09-29T00:26:20+5:30

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे ‘महादेव कोळी’ जमातीचे वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या. के.एल.वडणे यांनी रद्द ठरविले.

Ex-minister pitches comfort | माजी मंत्री पिचडांना दिलासा

माजी मंत्री पिचडांना दिलासा

googlenewsNext

औरंगाबाद : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे ‘महादेव कोळी’ जमातीचे वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या. के.एल.वडणे यांनी रद्द ठरविले. मात्र, त्यांना ‘कोळी महादेव’ जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पूर्वीच्या जात प्रमाणपत्राआधारे पिचड यांना मिळालेले लाभ त्यांच्याकडून काढून घेतले जाणार नाहीत, हे खंडपीठाने स्पष्ट केल्याने पिचड यांना दिलासा मिळाला आहे .
पिचड यांना संगमनेर येथील उपविभागीय कार्यालयाने ९ आॅगस्ट १९९९ रोजी ‘महादेव कोळी’ जमातीचे प्रमाणपत्र दिले होते. या आधारे त्यांना २२ जून २०११ रोजी वैधता प्रमाणपत्र मिळाले. त्याला नागपुरातील महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मित्रमंडळाचे भगवान नन्नावरे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.
मुलाला फटका बसणे कठीण
मुलाला वडिलांकडून जन्माने जात मिळत असते. पिचड यांचे चिरंजीव वैभव यांनी हे जात प्रमाणपत्र देऊन अकोले मतदारसंघातून राज्य विधानसभेवर निवडून आले आहेत. वडिलांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होईल, असे नाही. त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल. परंतु अशी याचिका निवडणूक निकालानंतर ९० दिवसांतच करता येत असल्याने ती केली जाणे किंवा ती न्यायालयात टिकणे कठीण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ex-minister pitches comfort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.