शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:44 AM2022-08-29T11:44:45+5:302022-08-29T11:45:23+5:30

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर संतोष बांगर यांनी मतदारसंघात मोर्चा काढत गद्दारांना जनता माफ करणार नाही असं म्हणत मी उद्धव ठाकरेंना साथ देणार असं म्हटलं होते.

Ex MLA Santosh Tarfe joined Shiv Sena, Shiv Sena Uddhav Thackeray Steps to compete with Shinde group MLA Santosh Bangar | शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्या बाजूने वळवले. विधान परिषद निवडणुकीचा निकाल येण्याआधीच शिंदेंसह एक एक आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यपालांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारला पत्र दिले. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

शिंदे गटातील या बंडखोरीत कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्याचं कारण म्हणजे विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने मत देणारे बांगर एका रात्रीत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आणि त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणी ठरावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने मतदान केले. संतोष बांगर यांच्या बंडाला टक्कर देण्यासाठी आता शिवसेनेने मोठी खेळी आखली आहे. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे हे शिवबंधन हाती बांधणार आहेत. टार्फे यांच्यासोबत शेतकरी नेते अजित मगर हेदेखील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. 

आगामी निवडणुकीत संतोष बांगर यांच्यासमोर माजी आमदार संतोष टार्फे यांना उमेदवारी देऊन बांगरांचा पराभव करायचा अशी शिवसेनेची रणनीती असू शकते. एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर संतोष बांगर यांनी मतदारसंघात मोर्चा काढत गद्दारांना जनता माफ करणार नाही असं म्हणत मी उद्धव ठाकरेंना साथ देणार असं म्हटलं होते. परंतु शिंदेसह सगळे आमदार गुवाहाटीतून परतल्यानंतर राज्यात नव्या सरकारची परीक्षा विधानसभेत होते. तत्पूर्वी विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यात आला. विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजपाचे राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उभे करण्यात आले तर मविआकडून राजन साळवींना उमेदवारी दिली. परंतु नार्वेकर यांनी या निवडणुकीत बाजी मारली. यावेळी संतोष बांगर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले होते. 

मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या बहुमत चाचणीपूर्वी संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाले. बहुमत चाचणीच्या दिवशी बांगर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. त्यानंतर विधानसभेत संतोष बांगर यांनी सरकारच्या बाजूने मतदान केल्यामुळे शिवसेनेचा आणखी एक आमदार फुटल्याची मोठी बातमी तेव्हा झाली होती. 

Web Title: Ex MLA Santosh Tarfe joined Shiv Sena, Shiv Sena Uddhav Thackeray Steps to compete with Shinde group MLA Santosh Bangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.