माजी खासदार गडाख यांना शिक्षा
By Admin | Published: February 13, 2016 01:39 AM2016-02-13T01:39:29+5:302016-02-13T01:39:29+5:30
पेट्रोल भेसळीच्या तपासणीत पोलीस कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरचे माजी खासदार तुकाराम गडाख व त्यांच्या मुलासह तिघांना जिल्हा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश
अहमदनगर : पेट्रोल भेसळीच्या तपासणीत पोलीस कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरचे माजी खासदार तुकाराम गडाख व त्यांच्या मुलासह तिघांना जिल्हा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश ए़ ए़ धुमकेकर यांनी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
गडाख यांच्या औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर घाटानजीकच्या पेट्रोल पंपावर तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी छापा टाकला़ गडाख यांचा मुलगा रविराज यास पोलीस अटक करण्यासाठी गेले असता, त्यांनी पोलिसांवर बंदूक रोखत सरकारी कामात अडथळा आणला़ त्यामुळे गडाख यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ त्यावर न्यायालयात सुनावणी झाली़ न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. गडाख पिता- पुत्र व कर्मचारी साहेबराव दळवी यांच्या विरोधातील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना एक महिना कारवासासह प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकार पक्षातर्फे अॅड़ नितीन भिंगारदिवे यांनी बाजू मांडली़ (प्रतिनिधी)