अवैधरित्या वास्तव्य करणारा अमेरिकेचा माजी सैनिक पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: May 21, 2017 03:36 PM2017-05-21T15:36:27+5:302017-05-21T15:36:27+5:30

व्हीजाची मुदत संपल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले

Ex-servicemen of the United States | अवैधरित्या वास्तव्य करणारा अमेरिकेचा माजी सैनिक पोलिसांच्या ताब्यात

अवैधरित्या वास्तव्य करणारा अमेरिकेचा माजी सैनिक पोलिसांच्या ताब्यात

Next

 ऑनलाइन  लोकमत
नागपूर, दि. 21 -  व्हीजाची मुदत संपल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशूवा मेसियाक लॅबोविथ (वय ३५) असे त्याचे नाव आहे. तो अमेरिकन सैन्य दलाचा माजी सैनिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो येथे नेमका कोणत्या उद्देशाने राहत होता, ते स्पष्ट न झाल्यामुळे याशूवा हेरगिरी तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाने प्रशासनाची झोप उडवून दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, याशूवा विदेशी सफरीच्या नावाखाली २०१३ मध्ये भारतात आला. १० जून २०१३ ला तो नागपुरात आला. सामाजिक कार्याच्या नावाखाली धर्माचा प्रचार प्रसार करताना याशूवाने काही मिशनरीजच्या माध्यमातून एका हॉटेलमध्ये प्रारंभी मुक्काम केला. नंतर मात्र त्याने एक भाड्याचे घर बघितले. सामाजिक कार्याच्या नावााखाली सर्वत्र मुक्त संचार आणि मुक्त संवाद करतानाच तो दीपाली नामक तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. पुढे हे दोघे दुस-या ठिकाणी आणि नंतर तेथून बोरगावमधील गोकुल हाऊसिंग सोसायटीतील अल्फाईन मेडॉस (फ्लॅट नं. ३०२) येथे वास्तव्याला आले. येथे हे दोघे आणि दीपालीची मैत्रीण परिसरातील नागरिकांच्या ओळखीचे आहे. ते काय कामधंदा करतात, ते कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांची लाईफ स्टाईल आलिशान असल्याचे परिसरातील मंडळी सांगतात. त्यांच्याकडे येणारांची खासकरून नव्या महिला-पुरुषांची सारखी वर्दळ असते.

असा झाला खुलासा

शहर पोलीस दलात उपायुक्त दर्जांच्या अधिका-यांचे नुकतेचे फेरबदल झाले. विशेष शाखेतही निलेश भरणे हे नवीन उपायुक्त रुजू झाले. त्यांनी विशेष शाखेचा रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी वेगवेगळळ्या पद्धतीने सर्वांकडून माहिती संकलीत करणे सुरू केले आहे. त्यातुन नागपुरात विदेशी नागरिक किती आहे, त्याचीही माहिती त्यांनी विविध पोलीस ठाण्यातून मागितली. त्यात साडेतीन वर्षांपूर्वी नागपुरात आलेला याशूवा लॅबोविथचे नाव अधोरेखित झाले. तो सध्या काय करतो, कुठे राहतो, त्याचा पासपोर्ट, व्हीजाची मुदत वाढवून घेतली काय, असे प्रश्न उपस्थित झाल्याने विशेष शाखेकडून १९ मे रोजी गिट्टीखदान पोलिसांना एक पत्र मिळाले. त्यानुसार, हवलदार गजानन ठाकरे आणि संजय पांडे यांनी याशूवाची शोधाशोध सुरू केली. चौकशीत याशूवा गोकुल सोसायटीत राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी शनिवारी त्याला गाठून त्याची विचारपूस केली. पुढे आलेल्या माहितीनंतर पोलीस दलच नव्हे तर अवघ्या प्रशासनातच खळबळ उडाली. याशूवाच्या व्हीजाची मुदत कधीचीच संपली अन् त्याने त्याच्या पासपोर्टचेही नुतनीकरण केले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिवारी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध विदेशी नागरिक कायदा १९४६ कलम १४, अ,ब,क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अनेक अधिकारी ठाण्यात पोहचले. तेव्हापासून तो येथे लपून छपून का राहत होता, काय करीत होता, दीपालीची काय भूमीका आहे, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करीत आहेत.
 
 हेरगिरीकडे अंगुलीनिर्देश

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावरून वादळ उठले आहे. पाकिस्तानने जाधव यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला आहे. दुसरीकडे चिनने अमेरिकेच्या १२ गुप्तहेरांची हत्या केल्याचे वृत्त सर्वत्र पोहचल्याने ह्यहेरगिरीह्णचा विषय जगभरात चर्चेला आला आहे. अशात अमेरिकन याशूवाचे नागपुरातील संशयास्पद वास्तव्य ह्यहेरगिरीह्णकडे अंगुलीनिर्देश करणारे ठरले आहे. त्यामुळे शहर पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. याशूवा संबंधीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
पासपोर्ट क्रमांक ५०४७४४२२०
निवासी परवाना क्रमांक (आरसी नंबर) १६४/ १३ (दि. ३० १०. २०१३)
पारपत्र नुतनीकरण अथवा व्हीसा मुदत वाढविण्यासंबंधात कुठेही अर्ज केलेला नाही.

Web Title: Ex-servicemen of the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.