परीक्षा पध्दती बदलणार

By admin | Published: May 26, 2016 02:19 AM2016-05-26T02:19:40+5:302016-05-26T02:19:40+5:30

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल

Exam method will change | परीक्षा पध्दती बदलणार

परीक्षा पध्दती बदलणार

Next

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल करणे यंदा शक्य नसल्याने परीक्षा पद्धतीत काही तातडीचे बदल करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. याबाबत दहावीच्या निकालानंतर तज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.
दहावीच्या निकालानंतर मंडळामध्ये तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे. अकरावी व बारावीच्या सीबीएसई व मंडळाच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. जवळपास सारखाच अभ्यासक्रम असला तरी सीबीएसईमध्ये अनेक संकल्पना विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. एका वर्षात अभ्यासक्रम बदलता येत नाही. सीबीएसईचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

दीड हजार निकाल राखीव
विविध कारणास्तव १ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यामुळे राज्य मंडळातर्फे औरंगाबाद विभागातील सर्वाधिक ९७३ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
तसेच पुणे विभागातील ९८, नागपूरमधील ३६२, मुंबईतील ८२,कोल्हापूरमधील १३ आणि लातूर मधील २४ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याच प्रमाणे कॉपी व अन्य कारणास्तव ७१४ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले.

खेळाडूंना गुणाची सवलत
खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विशेष गुण देण्यात आले. राज्यातील दोन हजार ५३७ बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्तरावर कौशल्य दाखविल्याबद्दल गुणांचा लाभ मिळाला.
त्यात पुणे विभागात सर्वाधिक ४५० नागपूर ३०३, औरंगाबाद २१२, मुंबई २९४, कोल्हापूर व अमरावती ३०० नाशिक ३३८ लातूर २९९ तर कोकण विभागातील ३२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा मिळाला.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश
बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. विविध व्यंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा राज्यभरातील निकाल ८९.६१ टक्के इतका लागला आहे.
अंध, बहिरे, मुके, शारीरिक व्यंग असणारे, डायलेक्झिया, मेंदूचा पक्षाघात, आॅटीझमग्रस्त, सेलेब्रल पाल्सी हा आजार असलेले आणि मतिमंद मुलांचा दिव्यांगामध्ये समावेश होतो.
राज्यभरातून असे पाच हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील पाच हजार २८ जणांनी यशस्वीपणे हा टप्पा पार केला आहे.

विभागपरीक्षेस बसलेलेपास झालेलेटक्केवारी
अंध११७५१०९६९३.२८
कर्णबधीर८२४६३०७६.४६
मुके१०९८४७७.०६
शारीरिक व्यंग२१६४१९५२९०.२०
मेंदूचा पक्षाघात८२७५९१.४६
डायलेक्झिया१०७३१०२३९५. २६
आॅटीझम१३१३१००
सेलेब्रल पाल्सी७८७०८९.७४
मतिमंद९३८५९१.४०
एकूण५६११५०२८८९.६१


बारावीची गेल्या पाच वर्षांची निकालाची टक्केवारी
वर्षनिकालाची टक्केवारी
२०१२७४.४६
२०१३७९.९५
२०१४९०.०३
२०१५९१.२६
२०१६८६.६०

Web Title: Exam method will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.