उमेदवारांची परीक्षा!

By Admin | Published: February 21, 2017 04:50 AM2017-02-21T04:50:14+5:302017-02-21T04:52:03+5:30

राज्यातील जनतेचा कौल आणि अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणाऱ्या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा

Examinations of candidates! | उमेदवारांची परीक्षा!

उमेदवारांची परीक्षा!

googlenewsNext

मुंबई : राज्यातील जनतेचा कौल आणि अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणाऱ्या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी आज मंगळवारी मतपरीक्षा होत आहे. निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची असली तरी, या निवडणुकीवरच सत्तारूढ भाजपा-शिवसेना युती सरकारचे गुणांकन अवलंबून असल्याने, सरकारसाठी ही ‘घटक चाचणी’च मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी कमालीची उत्कंठा लागून आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने या वेळी उमेदवारांची संख्याही वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने निवडणुकीचा पारा चढला होता.
या प्रचारज्वराने महाराष्ट्र अक्षरश: तापून निघाला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या चार महानगरांतील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. युती-आघाडी तुटल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३,२१० जागांसाठी १७,३३१ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. ३ कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात.
मतदान शांततेत पार पडावे, यासाठी २ लाख ७३ हजार ८५९ कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली होती.
वर्धा जिल्हा परिषदेच्या २ आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६ जागांबरोबरच त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ जागांसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले नव्हते.

मतदानाचा हक्क बजावा
या सर्व निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून राज्य निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी आढावादेखील घेण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांनी आता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदानाचा आपला हक्क आवश्य बजावावा, असे आवाहन सहारिया यांनी केले.
मतदारांच्या माहितीसाठी : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने यापूर्वीच जाहीर केले आहे. 

कायदा व सुव्यवस्थेबाबत कार्यवाही
प्रतिबंधात्मक कारवाई - ५४,०२५
नाकाबंदी - ९,७००
अवैध शस्त्र जप्त - २११
रोकड जप्त - ७५,६६,९८० (प्रकरणे १७)
अवैध दारू- ६,८१,५५६ लीटर (प्रकरणे १०,८९८)
आचारसंहिता भंग प्रकरणे - ३३८
मालमत्ता विद्रुपीकरण - ७७
तडीपार - ३७१

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिहाय उमेदवार
(कंसात एकूण जागा) :
रायगड (५९) - १८७,
रत्नागिरी (५५) - २२६,
सिंधुदुर्ग (५०) - १७०,
नाशिक (७३) - ३३८,
पुणे (७५) - ३७४,
सातारा (६४) - २८५,
सांगली (६०) - २२९,
सोलापूर (६८) - २७८,
कोल्हापूर (६७) - ३२२,
अमरावती (५९) - ४१७,
वर्धा (२) - ८,
यवतमाळ (६) - ३४
गडचिरोली (१६) - ८८.

महानगरपालिका ठळक नोंदी :
एकूण जागा - १,२६८
उमेदवार - ९,२०८
पुरूष मतदार - १,०४,२६,२८९
महिला मतदार - ९१,१०,१६५
इतर मतदार - ७४२
एकूण मतदार - १,९५,३७,१९६
मतदान केंद्रे - २१,००१
मतदान यंत्रे - सीयू - ५२,२७७ व बीयू- ५६,९३२
कर्मचारी - १,२९,७६१
वाहने - ६,८६८

जिल्हा परिषद, पं. स. ठळक नोंदी
जि. प. एकूण जागा - ६५४
जि. प. उमेदवार - २, ९५६
पं.स. एकूण जागा - १,२८८
पं.स. उमेदवार - ५,१६७
पुरूष मतदार - ९४,४३,९११
महिला मतदार - ८७,७९,६०४
इतर मतदार - १०१
एकूण मतदार - १,८२,२३,६१६
मतदान केंद्रे - २२,१५९
मतदान यंत्रे - सीयू ४३,६६६ व बीयू - ६५,४९९
कर्मचारी - १,४४,०९८
 
महापालिका व उमेदवार
महापालिकाजागाउमेदवार

बृहन्मुंबई २२७२,२७५
ठाणे       १३१  ८०५
उल्हासनगर ७८४७९
पुणे १६२ १,०९०
पिंपरी-चिंचवड१२८७७४
सोलापूर१०२६२३
नाशिक १२२८२१
अकोला८०५७९
अमरावती८७६२७
नागपूर१५११,१३५

Web Title: Examinations of candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.