मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महानिर्मितीची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:27 PM2018-08-30T18:27:50+5:302018-08-30T18:28:06+5:30

ऊर्जाक्षेत्र आणि विशेषतः कृषीक्षेत्र यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि देशात प्रथमच राबविल्या गेलेल्या अभिनव अशा "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने"अंतर्गत महानिर्मितीने सध्या एकूण ५०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात आता चांगलीच गती घेतली आहे. 

Excellent performance of Mahanagaram under Chief Minister solar agricultural scheme | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महानिर्मितीची दमदार कामगिरी

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महानिर्मितीची दमदार कामगिरी

Next

मुंबई- ऊर्जाक्षेत्र आणि विशेषतः कृषीक्षेत्र यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि देशात प्रथमच राबविल्या गेलेल्या अभिनव अशा "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने"अंतर्गत महानिर्मितीने सध्या एकूण ५०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात आता चांगलीच गती घेतली आहे.  त्यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण २०० मेगावॅट क्षमतेचे तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ३०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प मार्गी लावण्यात महानिर्मितीला यश मिळाले आहे. हे सर्व प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र येथे उभारण्यात येणार असल्याने एकूणच राज्याच्या सर्वांगीण कृषी उद्योगास चालना मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यातील २०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणी अंतर्गत १५० मेगावॅट सौर प्रकल्पासाठी व  ५० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्पासाठीचे स्वतंत्र कार्यादेश पारदर्शक निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विकासकाना देण्यात आलेले आहेत. महानिर्मिती व संबंधित विकासक यांच्यामध्ये (PPA) या सर्व प्रकल्पांसाठीचे वीज खरेदी करार संपन्न झालेले आहेत.  सध्या पहिल्या टप्प्यातील २० मेगावॅट क्षमतेचा गव्हाणकुंड सौर प्रकल्प, प्रत्येकी २ ते ७ मेगावॅट क्षमतेचे कुही, येरड, अंजनगाव- बारी, येवती या सर्व सौर प्रकल्पस्थळी पायाभूत सुविधा उभारणीचे काम महानिर्मितीतर्फे सुरू असून या ठिकाणी वीजवहनाकरिता वीज उपकेंद्र उभारणीचे कामही महावितरणतर्फे नियोजित आहे.  

तसेच दुसऱ्या टप्प्यातील २०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्पासाठीचे कार्यादेशही देण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यातील सौर प्रकल्प डिसेंबर २०१८ पर्यंत व दुसऱ्या टप्प्यातील सौर प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकते. २४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी व यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथील महानिर्मितीच्या प्रत्येकी २ मेगावॅट क्षमतेच्या महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पाची क्रियान्वयन चाचणी संपन्न झाल्यानंतर अन्य तांत्रिक चाचण्यादेखील सुरू असून या दोन्ही प्रकल्पांसाठीचा वीज खरेदी करार नुकताच महानिर्मिती व महावितरणमध्ये संपन्न झाला आहे.  हे प्रकल्प महानिर्मिती, महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने  उभारण्यात आलेले आहेत. 

प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव यांच्या अथक प्रयत्नांनी हे ५०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प मार्गी लागले आहेत. या सौर प्रकल्पांसाठीचे प्रत्यक्ष भूसंपादन, पायाभूत सुविधा उभारणीसाठीची कामे महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) विकास जयदेव, संचालक श्याम वर्धने, महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेश साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (सौरऊर्जा) सतीश चवरे, महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मार्गी लागली आहेत.


या अभिनव संकल्पनेचे जनक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे धडाडीचे ऊर्जावान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी या यशाबद्दल ऊर्जा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे व महानिर्मिती-महावितरणच्या सौर ऊर्जा चमुचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Web Title: Excellent performance of Mahanagaram under Chief Minister solar agricultural scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.