विषबाधेनंतर पूर्ण गावाने चहा पिणे दिले सोडून
By Admin | Published: January 23, 2017 04:03 AM2017-01-23T04:03:01+5:302017-01-23T04:03:01+5:30
तालुक्यातील धानोरा येथे पिसाळलेल्या गायींचे दूध प्यायल्याने सुमारे ८१ लोकांना विषबाधा झाल्यानंतर भीतीपोटी अख्या गावाने चहा पिणे
श्यामकुमार पुरे / सिल्लोड (जि. औरंगाबाद)
तालुक्यातील धानोरा येथे पिसाळलेल्या गायींचे दूध प्यायल्याने सुमारे ८१ लोकांना विषबाधा झाल्यानंतर भीतीपोटी अख्या गावाने चहा पिणे सोडून दिले आहे. दरम्यान विषबाधा झालेल्यांच्या घरी रविवारी विविध पक्षांचे नेते, आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन, महसूल अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र या सर्वांचीच ‘ब्लॅक टी’ घेणे पसंत केले.
गावात भीती पसरल्याने हॉटेल, डेअरी चालक, गावात उकडा लावलेल्या लोकांनीही दूध घेतले नाही. त्यामुळे येथील विक्रेत्यांना परगावी जाऊन दूध विकावे लागले. पाच दिवसांपूर्वी दोन पिसाळलेले
कुत्रे चावल्याने दोन गायी पिसाळल्या होत्या. त्यांचे दूध गावातील २० कुटुंबांतील ८१ लोकांनी घरात
वापरले होते. यामुळे त्यांना बाधा झाली होती. आरोग्य विभागाने या सर्वांवर प्रतिबंध म्हणून लसीकरण सुरू केले आहे.