नोटांच्या बदल्यात चिल्लरही मिळू शकतात - बँकांची ग्राहकांना सूचना

By admin | Published: November 10, 2016 12:49 PM2016-11-10T12:49:05+5:302016-11-10T15:05:43+5:30

नोटांच्या बदल्यात ग्राहकांना 10 रुपये, 20 रुपये तसेच चिल्लरदेखील मिळतील, अशा सूचना बँकांनी ग्राहकांना दिल्या आहेत.

In exchange for notes, you can get splurge - instructions to the customers of the bank | नोटांच्या बदल्यात चिल्लरही मिळू शकतात - बँकांची ग्राहकांना सूचना

नोटांच्या बदल्यात चिल्लरही मिळू शकतात - बँकांची ग्राहकांना सूचना

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आज (गुरुवारी) पहिल्यांदाच बँकांचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच बँकांबाहेर रांगा लावल्या आहेत. त्यात आजही देशभरातील एटीएम बंद राहणार असल्याने बँकांवर मोठ्या प्रमाणात याचा भार पडतो आहे. 
 
यामुळे बँक कर्मचा-यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात ग्राहकांना को-या तसेच 100 रुपयांच्याच नोटा मिळतील अशी अपेक्षा करु नका, याऐवजी 10 रुपये, 20 रुपये तसेच चिल्लरदेखील मिळतील, अशा सूचना बँकांनी ग्राहकांना दिल्या आहेत.  
 
तसेच स्वतः प्रमाणे इतरांनाही नोटा बदलून मिळाव्यात यासाठी स्वार्थी विचार न करता, दोन दिवस पुरतील एवढीच रक्कम घ्यावी. कारण सद्य परिस्थितीत बँकांकडेही मर्यादित नोटांचा साठा असल्याने सर्व ग्राहकांना पुरेसे पैसे मिळणे गरजेचं आहे.
त्यामुळे ग्राहकांनी हुज्जत न घालता सहकार्य करावे, असे आवाहनदेखील बँक कर्मचा-यांकडून करण्यात आले आहे. 
 

Web Title: In exchange for notes, you can get splurge - instructions to the customers of the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.