विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ - शिक्षणमंत्री

By admin | Published: November 22, 2015 02:54 AM2015-11-22T02:54:50+5:302015-11-22T02:54:50+5:30

नोव्हेंबर २०१५-१६च्या खरीप आणि रब्बी हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या १४ हजार ७०८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा

Excise Examination Fees For Students - Education Minister | विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ - शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ - शिक्षणमंत्री

Next

मुंबई : नोव्हेंबर २०१५-१६च्या खरीप आणि रब्बी हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
असलेल्या १४ हजार ७०८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा
शुल्क माफ करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
राज्यातील २०१५-१६च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पैसेवारीत ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागांतील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त गावांतील शालेय आणि महाविद्यालयीन आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे.

Web Title: Excise Examination Fees For Students - Education Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.