एसटीच्या डिझेलवरील कर माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:41 AM2018-05-29T06:41:56+5:302018-05-29T06:41:56+5:30
इंधनाच्या वाढत्या दराचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे.
मुंबई : इंधनाच्या वाढत्या दराचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे. महामंडळाला या अडचणीतून सोडविण्यासाठी एसटी बसेसच्या डिझेलवरील राज्य सरकारचे विविध कर माफ करावे, अशी मागणी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
रावते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून एसटी बसेसच्या डिझेलवरील विविध कर माफ करण्याची विनंती केली. दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाट इंधन दरवाढीचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर होत आहे. इंधन दरवाढीमुळे एसटीवर वर्षामागे ४०० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे महामंडळाचा कर्मचाºयांसमवेत होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत सापडला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता महामंडळाच्या बसेसला लागणाºया डिझेलवरील राज्य सरकारचे विविध कर माफ करावेत, अशी विनंती रावते यांनी केली.