खळबळजनक ! पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या
By Admin | Published: October 22, 2016 10:42 AM2016-10-22T10:42:32+5:302016-10-22T10:42:32+5:30
पती वेळ देत नसल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद येथील पडेगावमध्ये घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - पती वेळ देत नसल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद येथील पडेगावमध्ये घडली आहे. प्रवलिका मनोहर असे मृत महिलेचे नाव आहे. पती लग्नाआधी ज्याप्रमाणे वेळ द्यायचा त्याप्रमाणे लग्नानंतर वेळ देत नाही, म्हणून प्रवलिकाने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. नवरा वेळ देत नसल्याचे कारण तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
गंभीर बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी प्रवलिकाने सेल्फी काढून नव-याला पाठवला, आणि त्यानंतर आत्महत्या केली. प्रवलिकाचा पती खासगी बँकेत कामाला आहे. पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने तातडीने घर गाठले. दरम्यान, तिचा जिव वाचावा यासाठी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वीच प्रवलिकाचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर पती वेळ देत नाही, या क्षुल्लक कारणावरुन प्रवलिकाने स्वतःचे आयुष्य संपवल्याने त्यांच्या सर्व नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.