१५० वर्षापूर्वी सुरु असलेली ‘कुवारी पंगत’ उत्साहात

By Admin | Published: August 25, 2016 08:20 PM2016-08-25T20:20:52+5:302016-08-25T20:20:52+5:30

१५० वर्षापूर्वी सुरु झालेली कुवारी पंगतीची प्रथा आजही सुरु आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कुवारी पंगत येथे उत्साहात पार पडली.

The excitement of 'Kewari Pangat' which started 150 years ago | १५० वर्षापूर्वी सुरु असलेली ‘कुवारी पंगत’ उत्साहात

१५० वर्षापूर्वी सुरु असलेली ‘कुवारी पंगत’ उत्साहात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
कजगाव, दि. 25 : १५० वर्षापूर्वी सुरु झालेली कुवारी पंगतीची प्रथा आजही सुरु आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कुवारी पंगत येथे उत्साहात पार पडली. शेकडो बालकांनी गोडभाताचा आस्वाद घेतला.
दुष्काळी परिस्थितीत भाईकनशा फकीर बाबांनी १५० वर्षापूर्वी पाऊस पडावा यासाठी कुवारी पंगतीत गोड भात देण्याची सूचना गावकऱ्यांना दिली होती. यानुसार गावकऱ्यांंनी तांदूळ- साखर घरोघरी जावून एकत्र केले व कुवारी पंगत दिली. या पंगतीनंतर धो-धो पाऊस बसरला व गावकरी आनंदी झाले. ही प्रथा आजही पाळली जात आहे.

या भाईकनशा फकीर बाबांनी कजगाव येथे े जिवंत समाधी घेतली होती. तो बाबाचा दर्गा आज ंिहंदू-मुस्लीमांचे श्रद्धास्थान बनले आहे. दर्ग्याच्या प्रांगणात कुवारी पंगतीचे आयोजन केले जाते. २५ रोजी सकाळी ११ वाजता दर्ग्याचे जनाब यांच्या मंत्रोच्चारात माजी उपसरपंच शांतीलाल जैन, ग्रा.पं.सदस्य स्वप्नील पाटील, रवींद्रसिंग पवार, अख्तर खाटीक, जाकीर खाटीक यांचेसह शेकडो ग्रामस्थांच्या हस्ते दर्ग्यावर चादर चढवली.

नैवेद्य दाखवून कुवारी पंगतीस सुरुवात केली. यावेळी दिनेश पाटील, प्रकाश जैन, दिलीप जैन, पप्पू वाणी, अरुण पाटील, एकनाथ पाटील, कोमलसिंग पाटील, मुक्तारसिंग पाटील, समाधान पाटील, भालचंद्र पाटील, संजय पाटील, संतोष पाटील, मोनू सोनार, नाना पाटील, उत्तम पाटील, रोहीत पाटील, रहेमान शाह, अरुण महाजन, योगेश पाटील, कुणाल पाटील, नामू उस्ताद, भूषण पाटील, निलेश पाटील, राजेंद्र चौधरी, उमेश पाटील, उमेश पवार, निंबा निकम, जयपाल पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी ७-८ क्विंटलचा गोडभात बनविण्यात आला होता.

Web Title: The excitement of 'Kewari Pangat' which started 150 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.